आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षांत कमी प्रवासी पण बसमध्ये गर्दी, 'सीटर' बंदीचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मंगळवारपासून सीटर रिक्षांना बंदी घालण्यात आल्याने प्रवाशांनाच याचा जास्त फटका बसला. बसची संख्या तोकडी तसेच रिक्षाचालक टप्पा वाहतूक करत नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, चाकरमान्यांचे बरेच हाल झाले. शहर बसही हाऊसफुल्ल झाल्या होत्या. प्रवासी अक्षरश: बसच्या मागे धावत होते. पहिले बसची संख्या वाढवा, नाही तर सीटर रिक्षावरील बंदी उठवा, असा सवाल उपस्थित करत प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

बंदीचा निर्णय झाल्यानंतर रिक्षाचालक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तीनच प्रवासी घेऊन जात होते. त्यामुळे जिल्हा न्यायालय, क्रांती चौक, दूध डेअरी, आकाशवाणी, सेव्हन हिल्स, उच्च न्यायालय आदी थांब्यांवर प्रवाशांना दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागली. रिक्षाचालक स्टॉपवर थांबत नव्हते, तर बसमध्ये प्रवाशांची खचाखच गर्दी झाली. दरवाजाला लोंबकळून अनेकांनी प्रवास केला. पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसची संख्या वाढवण्याची गरज होती. प्रवाशांच्या हितासाठी कायदे असतात की हाल करण्यासाठी, असा प्रश्न विद्यार्थी- नागरिकांनी विचारला. अभियांत्रिकीची विद्यार्थिनी सुजाता अरक, वैशाली मोरे, कृष्णा खैरनार, संदीप कुलकर्णी, प्रा. डॉ. संदीप गढेकर, विजय जाधव यांनी संताप व्यक्त केला.

२१६रिक्षांवर कारवाई : मीटर बंद असणे, परवाना, ड्रेस, लायसन्स नसणे, प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या २१६ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानकातील मोकळी जागा, चिकलठाणा वर्कशॉप आणि छावणी ठाण्यासमोर रिक्षा लावल्या आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी दिली. दरम्यान, सिडको एन-५ टाऊन सेंटरजवळील ऑटोरिक्षा इलेक्ट्रिकल्स चालकाकडे रिक्षाचालकांनी मीटरसाठी पैसे भरले होते; पण त्यांना वेळेत मीटर देण्यात आले नाहीत. परिणामी, मंगळवारी रिक्षाचालक आणि मीटर विक्रेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. १०० पेक्षा जास्त रिक्षांची येथे रांग लागली होती. मीटर विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा किंमत वसूल केल्याची माहिती चालक सतीश बोरुडे, डी. एम. निकम यांनी दिली.

पोलिस-रिक्षाचालकांत बाचाबाची
मीटरने१४ रुपये प्रति किलोमीटर भाडे आकारण्यात आले. सिडको बसस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी शेअरिंगमध्ये प्रवाशांना प्रत्येकी ३० रुपये भाडे द्यावे लागले. टी पाॅइंट ते मध्यवर्ती बसस्थानक ३५ रुपये, रेल्वेस्टेशन ते सिडको बसस्थानक ३० रुपये भाडे होते. सीटर रिक्षापेक्षा १० ते १५ रुपये अधिक भाडे द्यावे लागले. सेव्हन हिल्सजवळ च्या सुमारास रिक्षाचालक पोलिसांत बाचाबाची झाली. पोलिसी खाक्या दाखवताच चालक पळून गेला.

रात्री उशिरापर्यंत कारवाई
नियमबाह्य प्रवास वाहतूक, मीटर, परवाना, ड्रेस, लायसन्स आदी तांत्रिक बाजू तपासण्यात आल्या. त्यामध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पथक कार्यरत राहणार आहे. सर्जेराव शेळके, आरटीओ.

दोन लाखांवर उत्पन्न
मंगळवारी ५५ सोडल्या. त्यातून लाखांवर उत्पन्न मिळाले. बुधवारी शिवाजीनगर मार्गावर एक बस, चिकलठाणा ते मध्यवर्ती बसस्थानक दोन, हर्सूल ते रेल्वेस्टेशन एक, टी-पाॅइंट ते सिडको बसस्थानक एक बस वाढवण्यात येणार आहे. यू. ए. पठाण, आगार प्रमुख,सिडको.
टप्पा वाहतूक बंद असल्याने प्रवासी बसच्या मागे असे धावत सुटले होते. छाया : अरुण तळेकर.
बातम्या आणखी आहेत...