आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये ८० मिमीपेक्षा कमी पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, जालना हिंगोली जिल्ह्यात आत्तापर्यत ८० मिमी पेक्षा कमी तर लातूर बीड उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांत १०० मीमीपेक्षा आधिक पाऊस झाला आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तीन जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस नाही. त्यामुळे किमान ६० ते ७० मीमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती प्रकल्प उपसंचालक एस.बी.शिरडकर यांनी दिली.

मराठवाड्यात दुष्काळाचा सर्वाधिक फटका लातूर, बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्याला बसला. मात्र यापैकी लातूर बीड उस्मानाबादमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. मात्र इतर जिल्ह्यांत आत्तापर्यंत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस
औरंगाबादजिल्ह्यात २५ जूनपर्यत केवळ ६२ मीमी पाऊस झाला आहे. २५ जूनच्या अपेक्षित सरासरी नुसार १०९ मीमी पाऊस अपेक्षित असताना आत्तापर्यंत केवळ ५७ टक्के पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्यात १०५ मिमी पाऊस अपेक्षित असताना केवळ ७१ मीमी म्हणजे सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...