नाशिक- जिल्ह्यातील रासायनिक प्रक्रियेशी निगडित उद्योगांना
आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळणार आहेत. धुळे, नगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतील उद्योगांमधील शंभर कर्मचाऱ्यांना भोपाळच्या डिझॅस्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रशिक्षित केले जाणार आहे. औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा विभाग आणि मार्क यांच्या वतीने राबवले जाणारे हे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण आहे.
16 आणि 17 ऑक्टोबर असे दोन िदवस दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या लवाटेनगर येथील सभागृहात शिबिर होणार असून, डिझॅस्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. राकेश दुबे यांच्यासह चार प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनास दिली जाणार असून, ऐन कुंभमेळ्याच्या काळात काही रसायन किंवा वायूगळतीची घटना उद्योगांत किंवा रस्त्यांवर झाल्यास काय केले गेले पाहिजे, हे कर्मचारी प्रशासनाला सांगतील. प्रत्यक्ष अशा आपत्तीवर मात करण्यासाठीही या कर्मचाऱ्यांचा फायदा करून घेता येणार आहे.
'मार्क' चाही पुढाकार
उद्योगांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचे असे प्रशिक्षण राज्यात पहिल्यांदाच आयोजित केले जात असून, याकामी औद्योगिक रोग्य व सुरक्षा विभाग आणि 'मार्क' णचा पुढाकार महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही करू अशी मानसिकता असलेल्या शासनाच्या विभागांसाठी हा नवा आदर्श म्हणावा लागेल.