आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन.रघुरामन यांचे 'जाणून घ्या मॅनेजमेंट फंडे', एमजीएममध्ये शनिवारी व्याख्यान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - 'दिव्यमराठी'च्या 'नॉलेज सिरीज'अंतर्गत शनिवारी २३ जानेवारी रोजी एन. रघुरामन यांचे 'जाणून घ्या मॅनेजमेंट फंडे' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दैनिक "दिव्य मराठी' आणि व्हेन्यु पार्टनर एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम एमजीएम कॅम्पसमधील आइन्स्टाइन हॉलमध्ये दुपारी ते या वेळेत आयोजित केला अाहे.

व्याख्यानात एन.रघुरामन मॅनेजमेंट फंडे सांगणार आहेत. "२०२० मधील बदलांच्या संधी' आणि त्यासाठी युवकांनी कशा प्रकारे तयारी करावी यावर मार्गदर्शन करणार आहे. एन.रघुरामन यांचे नाव भारतातील नावाजलेल्या मार्गदर्शकांमध्ये अग्रगण्य आहे. त्यांनी देशभरात विविध ठिकाणी 'मॅनेजमेंट फंडे' या विषयावर व्याख्यान दिले आहे. त्यांच्या कार्यक्रमांना श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यासोबतच 'मॅनेजमेंट फंडा' या सदरातून ते लिखाण करतात. त्यांचे हे सदरही प्रसिद्ध असून त्याची वाचक संख्या खूप मोठी आहे. लेखामधून वाचकांना त्यांचे नियमितपणे मार्गदर्शन लाभत आहे. आता त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची नामी संधी 'दिव्य मराठी' ने आपल्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. २३ जानेवारी रोजी एमजीएमच्या आइन्स्टाइन हॉलमध्ये दुपारी वाजता व्याख्यान सुरू होईल. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले मोफत असून काही जागा आरक्षित असतील. तसेच कार्यक्रम वेळेवर सुरू होईल, त्यामुळे सर्वांनी वेळेत आसनस्थ व्हावे. जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी 'दिव्य मराठी'चे(८३९०९०७८२०) यावर संपर्क साधावा, असे अावाहन करण्यात आले आहे.

व्याख्यान सर्वांसाठीच ठरणार उपयुक्त
२०२०मधील बदलांच्या संधी आणि त्यासाठी आपण कशी तयारी करावी' याविषयी एन.रघुरामन मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये काय बिंबवावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काय शिकवावे, व्यवस्थापकाने आपल्या सोबतच्या कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे प्रशिक्षित करावे आणि विद्यार्थ्यांनी स्वत:ला कसे घडवावे. याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे पालक,शिक्षक,विद्यार्थी,युवक आणि व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी ही हे व्याख्यान उपयुक्त ठरणार आहे.