आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lets Go Pandhari : Nath Palkhi Complete Circle In Devgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चला जाऊ पंढीरीला: नाथ पालखीचे रिंगण देवगावला उत्साहात पार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पालखीने पंढरपूरसाठी 29 जून रोजी प्रस्थान केले. या पालखीचा शेवटचा रिंगण सोहळा भूम तालुक्यातील अनाळे, देवगाव, नागडोह येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. देवगाव रत्नपूर मार्गावरील एका तलावाजवळदेखील रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर वारक-यांनी तलावात स्नान केले व आसपासच्या खेड्यांमधील ग्रामस्थांनी दिलेल्या भाजी - भाकरीचा विठुनाम स्मरण करत आस्वाद घेतला. पालखीचा मुक्काम अनाळे येथेच असतो.


तुझ्या ठाई भक्ती । तुझ्या साठीच येतो पंढरी, भान हरपून खेळ खेळतो, दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा असे म्हणत काल शेवटचे तिसरे रिंगण आटोपून दोनशे किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतरही विठुनामाचा गजर करत पंढरीकडे जाण्याचा वारक-यांचा उत्साह अमाप होता. पैठणहून नाथांची पालखी निघाली तेव्हा सोबतीला 14 दिंड्या होत्या आता दिंड्यांची संख्या 35 वर गेली आहे. गुरुवारी 11 जुलै रोजी दिंडीचा मुक्काम परंडा तालुक्यातील कंडारी, पापपिंळ येथे होणार आहे. या वेळी परंडा तालुक्यातील भाविक वारक-यांचे उत्स्फूर्त स्वागत करतात.


मुस्लिम कुटुंब पुरवते अश्वांना व बैलांना चारा
भूममधील शेख बाबा शेख हुसेन हे गेल्या तीन पिढ्यांपासून नाथांच्या पालखीला असणा-या बैलांना व रिंगणाला फेरी मारणा-या अश्वाला (घोडा) चारा-पाणी देण्याचे काम करत आहेत. त्यांची ही चारा देण्याची परंपरा निझामकाळापासून वडिलोपार्जितरीत्या अखंड सुरू आहे.