आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला, स्वत:च्या नावे एक रोपटे लावू; त्यातच आपले बालपण शोधू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मान्सून धडकला आहे. काही ठिकाणी पावसाने अजून जोम धरलेला नाही. दाटून येणारे ढग थोड्याच काळात बरसतील. सर्वदूर दमदार पाऊस होईल, अशी पूर्ण आशा आहे. दरवर्षीच्या पावसाळ्याप्रमाणेच यंदादेखील दैनिक भास्कर समूह आपल्या कोट्यवधी वाचकांच्या सोबतीने आजपासून झाडे लावा अभियान सुरू करत आहे. आम्ही लावलेली झाडे धरतीमातेच्या कुशीत सहजपणे वाढू शकतील यासाठी पावसाळाच योग्य आहे.

चला, आज आपण आणखी एका नव्या परंपरेचीही सुरुवात करु या... पावसाळ्याच्या या आल्हाददायक वातावरणात स्वत:च्या नावाचे एक रोपटे लावू आणि नंतर त्याची देखभाल, संगोपनही तेवढ्याच प्रेमळ भावनेने करूया. रोज सकाळी उठून आपल्या नावाचे हे रोपटे पाहू तेव्हा आमच्या चेह-यावर बालपणी असायचे तसेच निरागस हास्य उमटेल. प्रौढत्वीही निज शैशव जपण्याच्या मार्गात हे रोपटेच एक सेतू म्हणून काम करील. बाल्य जपतानाच पुन्हा ते जगूया...
कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी हे करा. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या नावे झाड लावावे. भास्कर समूहाच्या कोट्यवधी वाचकांनी प्रत्येकी एक झाड जरी लावले आणि त्याचे संवर्धन केले तर आम्ही पर्यावरणाला हिरवाईची भेट देऊ. शिवाय येणा-या पिढ्यांना आपल्या नावाचा हा अनमोल वारसाही देऊ शकू.

आपल्या नावे एखादी औषधी वनस्पती लावली तर आणखी चांगले. स्वच्छ हवेसोबतच ती आम्हाला आरोग्यही देईल. आमचा श्वास या वृक्षांशीच जोडलेला असतो. चला, हे बंध आणखी भक्कम करूया. आजच आपल्या नावाचे एक रोपटे लावा.
चांगल्या पावसाच्या शुभेच्छा!

आपला
रमेशचंद्र अग्रवाल, चेअरमन,
दैनिक भास्कर समूह