आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • License For Daily Needs , Milk Shop In Aurangabad

खाद्यपदार्थ, दूध विक्रीसाठी आता 500 रुपयांचा परवाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डेली नीड्स, छोट्या डेअरी आणि दुचाकीवरून घरपोच दूध विक्री करणार्‍यांना आता अन्न व औषधी प्रशासनाकडे पाचशे रुपये परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. 4 फेब्रुवारीनंतर दूध विक्रेत्यांना अशा प्रकारचे दूध विक्री करता येणार नसल्याची माहीती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी दिली.

परवाने बंधनकारक : दूध विक्रेत्यांसह हातगाडी, तीन व चारचाकी वाहनांवर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या सर्वांनाच हा परवाना बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये भाजी, फळ, कुल्फी, पाणी पुरी, भेळ, आइस गोळा, दाबेली, कचोरी आदी पदार्थ विक्रेत्यांचा समावेश आहे. या परवाना मोहिमेमुळे खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांचा डाटा उपलब्ध होऊन नागरिकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच भेसळयुक्त पदार्थ विक्री करणार्‍यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

ऑनलाइन भरता येईल अर्ज : अन्न व औषध प्रशासनाच्या वेबसाइटवरूनही परवान्यासाठी अर्ज करता येईल. लालफितीच्या कारभारास कंटाळून अनेक जण परवाना घेण्यास टाळाटाळ करतात. याच कमकुवत बाजूचा विचार करून या विभागाने व्यावसायिकांसाठी महाकोश ग्रास वेबसाइट वरून परवाना देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

* परवाना बंधनकारक करण्यात आल्याने मागील दोन दिवसांपासून आम्ही दूध खरेदी करणे बंद केले आहे. दररोज दीडशे लिटर दूध विक्री होत होती. परवाना घेतल्यावरच दूध विक्री केली जाईल. बाबूराव कदम, दूध विक्रेता, सिडको एन- 5

परवाना ऑनलाइन मिळणार
आतापर्यंत झाले ते झाले. मात्र, खुले खाद्यपदार्थ व दूध विक्री करणार्‍यांना एका महिन्यांत परवाना घेण्याची आम्ही अट घातली आहे. तपासणीनंतर ऑनलाइन तातडीने परवाना देण्याची सुविधा पाचशे रुपयांत उपलब्ध करून दिली आहे. चंद्रशेखर साळुंके, सहआयुक्त, अन्न व औषधी प्रशासन.