आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांना सैन्यात आणण्यासाठी धडपडणारा ले. शाहरुख अली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तरुणांनी सैन्यात यावे, अधिकारी व्हावे यासाठी लष्करात लेफ्टनंट असलेल्या शाहरूख अली यांनी विशेष प्रयत्न चालवले आहेत. सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचे (एसपीआय) विद्यार्थी शाहरूख यांनी सुटीच्या काळात वर्धा जिल्ह्यातील शाळांमध्ये खास वर्ग घेतले. एसपीआयमध्ये प्रवेशासाठी सर्वत्र शिकवणींचे पीक आले असतानाही शाहरूख यांनी मुलांना मोफत मार्गदर्शन केले. याचा परिपाक म्हणून प्रवेश परीक्षेसाठी वर्धा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अर्ज आले. अनेक जण मुलाखतीलाही पात्र ठरले. अंतिम यादीत तिघांची निवड झाली. वर्धा येथील रिक्षाचालकाचा मुलगा असलेल्या शाहरूख यांची चिकाटी आणि धडपड कामी आली.

एसपीआयचे माजी विद्यार्थी आणि याच संस्थेतून लष्करात अधिकारी झालेले शाहरूख अली यांची आपल्या जिल्ह्यातील मुले एसपीआयमार्फत सैन्यात अधिकारी व्हावेत ही इच्छा. या ध्येयाने झपाटलेल्या शाहरूख यांनी २०१५ मध्ये सुटीवर आले. महिनाभर वर्धा शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. वर्धा येथील नवोदय विद्यालय, अग्रगामी हायस्कूल, सरस्वती विद्या मंदिर व महर्षी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना शाहरूख यांनी सैन्यात सेवेसाठी आवाहन केले.

औरंगाबाद, नागपुरातून १६५ मुले मुलाखतीस
लेफ्टनंट शाहरुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी एसपीआयच्या २०१६ मधील प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केले. औरंगाबाद व नागपूर केंद्रासाठी १६५ विद्यार्थी पात्र ठरले. यात शाहरुख यांनी वर्ग घेतलेल्या शाळांचे १० विद्यार्थी होते. शाहरुख यांचा भाऊ लकी अली याच्यासह चिन्मय भाकरे, अल्पेश थमके (राखीव) यांची अंतिम यादीत निवड झाली.

लष्करी अधिकारी होण्याची मुस्लिमांमध्ये महत्त्वाकांक्षा
भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी मुस्लिम तरुणांमध्ये स्पर्धा आहे. देशभक्तीने प्रेरीत तरुण देशसेवेसाठी पुढे सरसावले आहेत. एसपीआयच्या इतिहासात प्रथमच चार मुस्लिम तरुणांची अंतिमत: निवड झालेली आहे. यात लकी अली, मुंबईचे जुळे भाऊ सय्यद साहील दस्तगीर व सय्यद समीन दस्तगीर आणि मुल्ला फैजल जावेद आदींचा समावेश आहे. ले. शाहरुख यांच्या प्रयत्नाचे हे फळ आहे.
बातम्या आणखी आहेत...