आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीला रॉकेल ओतून पेटवणाऱ्या प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा आणि दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- प्रेयसीला रॉकेल ओतून पेटवणाऱ्या प्रियकरास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

शीतल अर्जुन पट्टे (२२,इंदिरानगर, गारखेडा परिसर) हिचा २००२ मध्ये अर्जुनसोबत विवाह झाला. काही दिवसांनी फारकत घेऊन शीतल बहीण संगीता मोहन भुगरे यांच्याकडे राहण्यासाठी आली. तिथे राजू भगीरथ इरचे (२२) याच्यासोबत शीतलचे प्रेमसंबंध जुळले ते दोघे एकत्र राहू लागले. 

२६ मे २०१० रोजी राजू आणि शीतलचे भांडण झाले. मला सोडून दे, दुसरे लग्न करायचे आहे, असे राजूचे म्हणणे होते. मध्यरात्री राजूने रॉकेल टाकून शीतलला पेटवून दिले. शीतलला घाटीत दाखल केले असता उपचारादरम्यान २४ जून २०१० रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्युपूर्व जबाबावरून जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक व्ही. व्ही. मनाळे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. शेटे यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. सहायक लोकअभियोक्ता मधुकर आहिर यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात चौघांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने राजू इरचे यास दोषी ठरवून जन्मठेप, १० हजार रुपये दंड, दंड भरल्यास महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. 
बातम्या आणखी आहेत...