आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षांपूर्वी निर्दोष, अाता आई-मुलास जन्मठेप; परिस्थितिजन्य पुराव्यांआधारे खंडपीठाचा निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोलिआेने कायमचे अपंगत्व आलेल्या पतीचा खून करणाऱ्या महिला तिच्या मुलास खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्यातील दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात उस्मानाबादच्या सत्र न्यायालयाने सोळा वर्षांपूर्वी आरोपी कोण हे सिद्ध होत नसल्याचा निर्वाळा दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे न्या. ए. एम. ढवळे यांनी खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितिजन्य पुराव्यांआधारे मृताच्या पत्नी मुलास भादंवि ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

 

लोहारा खुद्रुक (जि. उस्मानाबाद) येथील त्र्यंबक रसाळ (६०) यांना पोलिआेमुळे अपंगत्व आले होते. शेतीचे काम होत नसल्याने पत्नी इंदुबाई मुलगा सतीश रसाळ यांच्याशी वाद व्हायचे. वाद विकोपास गेल्याने त्र्यंबक कुटुंबापासून वेगळे राहू लागले. उपजीविकेसाठी त्यांनी आपल्या नावावरील काही जमीन गावातील अलबक्ष नामक व्यक्तीस कसण्यासाठी दिली होती. हा व्यवहार नोटरीद्वारे झाला होता. अलबक्ष प्रत्यक्ष जमीन कसण्यासाठी गेला तेव्हा त्र्यंबकची पत्नी इंदुबाई मुलगा सतीश यांनी विरोध केला. याविरोधात अलबक्षने स्थानिक न्यायालयात दावा दाखल केला. त्र्यंबक यांनी ही जमीन अलबक्षला दिली तर आपल्याला काहीच मालमत्ता मिळणार नाही या विचाराने पत्नी मुलाने खुनाचा कट रचला. 


घरात केला खून
त्र्यंबकयांना २८ एप्रिल २००० रोजी पत्नी आणि मुलाने जीपमध्ये टाकून लोहारा बुद्रुक येथून लोहारा खुद्रुक येथील घरी नेले. तेथे सुमारे चार तास भांडण सुरू होते. ते शेजारच्यांनी ऐकले. पुढे ते घटनेचे साक्षीदार म्हणून खटल्यात होते. मुलगा सतीशने वडिलांचे निधन झाल्याची बातमी गावाचे सरपंच नातेवाईक व्यंकट रसाळ यांना दूरध्वनीद्वारे सांगितली. व्यंकट घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना त्र्यंबक यांचे पार्थिव व्हरांड्यात पडलेले आढळले. त्यांनी लोहारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सत्र न्यायालय उस्मानाबाद यांनी सर्वांना निर्दोष सोडले. 


शासनाचे खंडपीठात अपील
उस्मानाबादसत्र न्यायालयाच्या २१ जुलै २००१ च्या आदेशाला राज्य शासनाने खंडपीठात आव्हान दिले. पत्नी, मुलगा त्र्यंबक यांच्यात जमिनीचा वाद होता. अलबक्षसोबत त्यांनी जमिनीची कागदोपत्री कारवाई केलेली होती. घटनेच्या दिवशी जीपमधून नेताना दोघा व्यक्तींनी इंदुबाई मुलगा सतीश यास बघितले होते. त्र्यंबक यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला होता. काठी, धोतर आणि रुमालावर रक्ताचे डाग होते तसेच गळ्यावर व्रण होता. गुप्तांगावर घाव असल्याचे वैद्यकीय अहवालावर नमूद करण्यात आले होते. या सर्व बाबींमुळे मृताने आत्महत्या केली अथवा अपघात झाल्याचे सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद सहायक सरकारी वकील प्रशांत बोराडे यांनी केला. परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारे निर्दोष सुटलेली पत्नी मुलास खंडपीठाने जन्मठेप सुनावली. दोघे जामिनावर असून त्यांना पंधरा दिवसांत हजर करून शिक्षा भोगण्याचे नमूद केले आहे. खटल्याचा निकाल खंडपीठाने ६ नोव्हेंबर रोजी राखून ठेवला आणि ५ डिसेंबरला जाहीर केला. यातील विश्वनाथ शांताराम घडावे कमलाकर सोपान रसाळ यांना निर्दोष सोडले. 

बातम्या आणखी आहेत...