आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबटे शासकीय कागदावरून झाले गायब : जिल्ह्यात १३ ते १५ बिबटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातील जंगलात १३ ते १५ बिबटे असावेत, असा प्राणिमित्रांचा अंदाज आहे. गतवर्षी ही संख्या १२ होती. मात्र यंदा जिल्ह्यात एकही बिबट्या नसल्याचा अहवाल वन विभागाने दिला आहे. हा अहवाल अचूक नसल्याचा युक्तिवाद करण्यात येत असला तरी इतका फरक कसा पडू शकतो, असा प्रश्न पडला आहे. जिल्ह्यात एकही माळढोक नसल्याचेही हा अहवाल सांगतो.
मे या दिवशी, बौद्ध पौर्णिमेला करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात एकही बिबट्या नसल्याचा अहवाल वन विभागाने तयार केला आहे. रान डुक्कर, मोर, निलगाय यांची संख्या प्रत्येकी हजाराच्या वर आहे. अस्वलांची संख्या अवघी आहे. वन विभागाकडून जेव्हा वन्यप्राणी प्रगणना करण्यात येते तेव्हा सर्वांच्या नजरा बिबट्यांकडे लागतात. जिल्ह्यात गतवर्षीही वाघ नव्हते आणि यंदाच्या गणनेतही ते नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु अचानक १२ बिबटे कोठे गायब झाले, असा प्रश्न पडला आहे. प्राणिमित्रांच्या मते गतवर्षीच्या १२ च्या संख्येत किमान ते ने वाढ होणे अपेक्षित होते. अन्य प्राण्यांच्या संख्येत सरासरी ते टक्के वाढ झाली असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येते. अहवालातील गडबड फक्त बिबट्यांच्या संख्येच्या बाबतीत झाली आहे.

प्राणिसंख्या
बिबट्या
लांडगा २११
तडस ५५
अस्वल
निलगाय १०३७
काळवीट ४४८
भेकड १२७
रानडुक्कर १५२२
ससा ३८१
सायाळ ३२
कोल्हा १३३
खोकड ६४
मोर १२२०
माळढोक
इतर प्राणी २३८

अशी होते गणना
प्राणिगणनाही बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी होते. कारण जंगलात स्वच्छ प्रकाश असतो. पाणवठ्यांवर येणारे प्राणी सहज दिसतात. प्राणिमित्र, स्वयंसेवक तसेच वन कर्मचारी ही गणना करतात.

जुन्या पद्धतीने गणना केली. त्यामुळे ती बिनचूक आहे, असे म्हणता येणार नाही. जिल्ह्यात बिबटे नाहीत असे म्हणू शकत नसलो तरी अधिकृत आकडे तेच सांगतात. ए.पी. गिऱ्हेपुजे, उपवनसंरक्षक.
गणनेत गडबड
जिल्ह्यात१३ ते १५ बिबटे असावेत, असा आमचा अंदाज आहे. अनेकांनी ते बघितलेही आहे. त्यामुळे या गणनेत काहीतरी गडबड असल्याचे वाटते. डॉ.दिलीप यार्दी, प्राणिमित्र.
बातम्या आणखी आहेत...