आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liquor Company Near School In Paithan Midc Auarangabad

पैठण एमआयडीसीत शाळेशेजारीच मद्यनिर्मिती कारखाना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - पैठण एमआयडीसीतील मुद्दलवाडी परिसरात गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेशेजारीच मद्यनिर्मितीचा कारखाना झाला आहे. कारखान्यातील बॉयलरच्या आवाजाने शिक्षक काय शिकवतात हे विद्यार्थ्यांना ऐकू येत नाही. बॉयलरमधून निघणा-या धुराचा विद्यार्थी व शिक्षकांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे दुस-या जागेवर शाळा स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व विद्यार्थी करत आहेत.
मुद्दलवाडी परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 209 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेशेजारीच मद्यनिर्मितीचा कारखाना सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना कारखान्याच्या बॉयलरचा आवाज व बॉयलरमधून निघणा-या धुराचा त्रास होत आहे. बॉयलरच्या आवाजामुळे शिक्षक काय शिकवितात हे विद्यार्थ्यांना व्यवस्थित ऐकू येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ही शाळा दुस-या जागेवर स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व विद्यार्थी करत आहेत.
आवाज कमी करा- कारखान्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. कारखान्यातून येणा-या आवाजाची तीव्रता कमी करण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले आहे. -रेखा जाधव, सरपंच, मुद्दलवाडी
धुराचा परिणाम - मद्यनिर्मिती कारखान्याच्या बॉयलरचा आवाजामुळे विद्यार्थ्यांच्या कानाचे लहान पडदे खराब होऊ शकतात. तसेच बॉयलरच्या धुराचा आरोग्यावर परिणाम होतो. - डॉ. पंडित किल्लारीकर
नियम धाब्यावर - शासकीय नियम धाब्यावर बसवून हा मद्यनिर्मितीचा खारखाना उभारण्यात आला आहे. या कारखान्यासंदर्भात लेखी तक्रार करणार आहे. - जयश्री चव्हाण, गटशिक्षण अधिकारी