आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा वर्षांच्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सहा वर्षीय चिमुकलीवर नराधमाने बलात्कार केल्याची घटना मुकुंदवाडीतील जयभवानीनगरात बुधवारी दुपारी घडली. घटना उघड होताच २७ वर्षीय नराधम भीतीने पसार झाला. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. बालिका अंगणात खेळत होती.
तिला आइस्क्रीमचे आमिष दाखवून पडक्या घरात बोलावले आणि या नराधमाने अत्याचार केला. बालिकेच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती घटनास्थळी रडत पडलेली दिसून आली. तिच्या कुटुंबीयांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निकम करत आहेत.