आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कितीही निंदा, जायकवाडीचे पाणी अडवणे, नगर जिल्ह्यातच जिरवणे हाच आमचा धंदा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भर पावसाळयात पिण्याच्या नावाखाली प्रवरा नदीच्या ओझरवेअर प्रकल्पाचे दोन्ही कालवे पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ओझरवेअर ते जायकवाडीपर्यत १५ बंधारे आहेत. यामध्ये काही बंधाऱ्याचे गेटही उघडलेले नाहीत. त्यामुळे जायकवाडीकडे येणारे पाणी अडवणे आणि ते नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहता या तालुक्यांतील शेतीसाठी जिरवणे एवढाच उद्योग सुरू असल्याचे मत याचिकाकर्ते अभिजीत धानोरकर यांनी व्यक्त केले. त्यानंतर ‘दिव्य मराठी’ने मंगळवार आणि गुरुवारी (दि. ४) दोन दिवसांत केलेल्या पाहणीत उघड झाले आहे. यावेळी प्रवरेवरील ओझर वेअरपासून ते मधमेश्वरपर्यंत सर्व १५ बंधाऱ्यांची पाहणी केली. यात पावसातही ओझरवेअरमधून कालवे सुरू असल्याचे समोर आले आहे. पाणी सोडल्याच्या कडा विभागाला कळवलेल्या नोंदी आणि प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे. या प्रत्येक बंधाऱ्याची क्षमता सरासरी ५ दलघमी आहे.
अशी ही हक्काच्या पाण्याची पळवापळवी
१६ जुलैपासून ओझर वेअर बंधाऱ्याच्या डाव्या कालव्यातून ९५२ आणि उजव्यातून ३२५ असे १२७७ क्युसेक पाणी रोज श्रीरामपूर आणि राहता तालुक्यासाठी सोडण्यात येत होते.
ओझर वेअरच्या कालव्यातून वळवले पाऊण टीएमसी पाणी
सात दिवसांत
१६.५१ दलघमी पाणी वळवण्यात आले. त्यानंतर हा कालवा पुन्हा सुरू केला.
तीन ते सहा ऑगस्ट
पुन्हा डावा कालव्यातून ८५० आणि उजव्यातून २०० क्युसेक पाणी वळण्यात येत आहे.
चार दिवसांत ६.५१ तर आतापर्यंत
२३ दलघमी(०.८१ टीएमसी) पाणी वळवण्यात आले आहे.
गेटच्या माध्यमातून अडवले जाते पाणी
औरंगाबाद ते ओझर वेअर हे अंतर ६० किमी आहे. औरंगाबादकडून ओझर वेअरकडे जाताना प्रथम मधमेश्वर बंधारा लागतो. या बंधाऱ्याच्या ८० पैकी ३१ दरवाजे मंगळवारी उघडे होते तर काहीच्या दोन फळयाच काढल्या होत्या. पाचेगाव बंधाऱ्याला ३० पैकी २६ उघडे आहेत. वांगी बंधाऱ्याचे सर्व ३९ दरवाजे बंद होते. भर्डापूर बंधाऱ्याचे सर्व ४८ दरवाजे बंद होते. लाख मांळुजे या बंधाऱ्याचेही ३० दरवाजे बंद आहेत.
अडथळेच अडथळे
ओझर वेअरमधून सोडले जाणारे पाणी जायकवाडीला येईपर्यंत अडथळेच अडथळे आहेत. गुरुवारी या बंधाऱ्याच्या सांडव्यावरून ६९०० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. मात्र हे पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचले नाही. पहिला अडथळा कालव्यातून पाणी वळवून आणला जातो. डाव्या कालव्यातून ९०० तर उजव्यातून ३०० क्युसेक पाणी वळवण्यात येत आहे. ओझर बंधाऱ्यातून पाणी सोडल्यानंतर पहिल्यांदा आश्वी बंधारा लागतो. या बंधाऱ्याचे गेट उघडे ठेवण्यात आले आहेत. नंतरच्या चणेगाव बंधांऱ्याना ७७ दरवाजे असून त्यापैकी ५ बंद आहेत. यानंतरच्या रामपूर बंधाऱ्याचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले असले तरी त्यापुढच्या मांडवे बंधाऱ्याचे ३४ पैकी ४ दरवाजे बंद आहेत. त्यापुढच्या मांडवे बंधाऱ्याचे ३४ पैकी चार दरवाजे बंद आहेत. गळलिंब बंधाऱ्याचेा ४२ पैकी ४ दरवाजे बंद असून २ फळ्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणी संथ गतीने येत आहे.
अशी केली पाहणी
‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने ‘टेल टू हेड’ आणि ‘हेड टू टेल’ परिस्थितीची पाहणी केली. त्यामध्ये बंधाऱ्याचे दरवाजे उघडलेले तसेच काही ठिकाणी दरवाजाच्या पाचपैकी दोन फळ्या तशाच असल्याचे पाहणीत उघड झाले.
पावसाळ्यात विसर्ग का?‌
१२ जुलैलाच जलसंपत्ती नियमन प्राधिककरणाकडे नगरमधून जायकवाडीत येणारे पाणी वळवले जात असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर प्राधिकरणाने महामंडळाला याचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. पावसाळ्यात कालव्याच्या माध्यमातून पाणी वळवू नये, असे आदेश असतानाही त्याचे पालन होत नाही.
अभिजित धानोरकर, याचिकाकर्ते, परभणी
बातम्या आणखी आहेत...