आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loan Waive Farmer Committeed Suicide In Sillod Taluka

सिल्लोड तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उंडणगाव - कर्जाचे हप्ते फेडू न शकल्याने 35 वर्षीय शेतकर्‍याने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे घडली. सुभाष नारायण लबडे (35) यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतले होते. त्यातच ट्रॅक्टर घेण्यासाठी अन्य बँकेकडूनही कर्ज घेतले होते.

यंदा नापिकीमुळे बँकेच्या कर्जाचे हप्ते थकले होते. त्यामुळे कुटुंब दडपणाखाली होते. कर्जाची परतफेड करता येत नसल्याच्या विवंचनेत सुभाष यांनी शनिवारी सायंकाळी विष घेतले. त्यांना तातडीने सिल्लोड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. सुभाष यांच्या पश्चात पत्नी सुनिता, 3 मुली आहेत.