आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - गस्ती वाढवून घरफोडी करणार्यांना ‘लॉक’ करण्यासाठी पोलिसांनी लाख प्रयत्न केले. सराईत गुन्हेगारांनी त्यांची यंत्रणा मोडीत काढून पोलिसांची डोकेदुखी वाढवली आणि त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यास भाग पाडले. चोरट्यांचे कर्दनकाळ आता पोलिस नसून बाजारात आलेले दोन यंत्र ठरणार आहेत. काही क्षणांत चोरट्यांचा फोटो आणि त्याची माहिती पोलिस आणि संबंधितास देणार्या यंत्राने चोरट्यासमोरच आव्हान उभे केले आहे.
घरफोडी होण्याच्या धाकापायी मित्र, नातेवाइकांपासून दुरावलेल्यांना आता बिनधास्त गावी जाता येईल. पोलिसांच्या मदतीशिवाय घर आणि दुकानाचे रक्षण करण्यासाठी बाजारात नवीन व्हिपर सिक्युरिटी अलार्म पॅडलॉक आणि अँटो डायल अलार्म सिस्टिमचे यंत्र आले आहे. चोरटे दुकानात घुसल्यास एका क्षणात छायाचित्रासह चोरट्यांची माहिती पोलिस कंट्रोल रूम आणि दुकान मालकाच्या मोबाइल नंबरवर जाईल. काही क्षणानंतर सायरन वाजण्यास सुरुवात होऊन जोपर्यंत रिमोटने बंद करत नाही, तोपर्यंत सायरन वाजतच राहील, तर ज्या घराच्या दारावर व्हिपर सिक्युरिटी अलार्म पॅडलॉक असेल, त्याला चोरट्याचा स्पर्श झाल्यास प्रथम बीप बीप असा आवाज येईल. चोरट्याने त्यावर हातोड्याने वार केल्यास शंभर मीटरपर्यंत आवाज जाईल, एवढय़ा मोठय़ाने सायरन वाजेल. शहरातच हे यंत्र उपलब्ध होत असले, तरी नांदेड, लातूर, जळगावसारख्या शहरांतील व्यापार्यांनीही दुकानात बसवून घेतले आहेत. दरोडा पडल्यानंतर पोलिस सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांना पकडतात. या यंत्रामुळे चोरट्यांची छायाचित्रे टिपली जातील, असे ज्वेलर्स र्शीनिवास टाक यांनी म्हटले आहे. बाजारात आलेले लॉक महाग असले, तरी आमची सुरक्षा करणारे आहे, असा विश्वास गादिया विहार येथील ठेकेदार रवींद्र जाधव यांनी व्यक्त केला.
व्हिपर सिक्युरिटी अलार्म पॅडलॉक : 1500-4000 रुपये
अँटो डायल अलार्म सिस्टिमचे यंत्र : 50 हजार ते 3 लाख रु.
अशी आहे अँटो डायल अलार्म सिस्टिम
बँक, सराफांच्या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करताच इन्फ्रारेडच्या (लेसर किरण) रेषेत जो कोणी येईल, त्याचे छायाचित्र काही क्षणात त्यात फीड केलेल्या नंबरवर जाईल. याशिवाय घरात किंवा दुकानात गॅस गळती अथवा आग लागल्यास त्याचादेखील संदेश मोबाइलवर देण्याची सोय या यंत्रात असल्याने बँक, सराफ आणि पतसंस्थांनी ते बसवून घेण्यास सुरुवात केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.