आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

निवडणुकीसाठी नेत्यांनी शिवले खादीचे झब्बे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-येत्या महिनाभरात जिल्हाभराचा कानाकोपरा धुंडाळत मतदारांसमोर हात जोडण्यासाठी निघणार्‍या राजकीय नेत्यांनी आपल्या लूकवर विशेष भर दिला आहे. सर्वच नेत्यांनी लोकशाहीच्या या लग्नासाठी नवीन कपडे शिवून घेतले आहेत. जवाहरलाल नेहरू यांचे नाव असलेला नेहरू शर्ट याही निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना प्रिय असून हे शर्ट, त्यावर जाकीट आणि खूपच तरुण नेते असतील तर खादीचे अध्र्या बाहय़ांचे शॉर्ट शर्ट हे टिपिकल स्टाइल स्टेटमेंट पाहायला मिळत आहे.
नेता म्हटले की नेहरू शर्ट, झब्बा, जाकीट, खादी, सिल्क खादी अशी वेशभूषा डोळ्यासमोर येते. मतदारांसमोर जायचे असल्याने तर वेशभूषेबाबत या नेत्यांना जागरूक राहावे लागते. एसी गाडीतून असली तरी दगदग मोठीच होते. नेत्यांना आपली इमेज कायम फ्रेश राहावी यासाठी मेहनत घ्यावी लागते. त्यात वेशभूषेचा वाटा महत्त्वाचा आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 24 एप्रिलला होणार्‍या निवडणुकीचे प्रचाराचे काम हळू सुरू असले तरी नेत्यांची आणि दुसर्‍या फळीतील नेत्यांची पूर्वतयारी झाली आहे. खादीचे ड्रेस शिवून देणार्‍या टेलर्सकडील काम जवळपास आटोपत आले आहे. काहींनी तर महिनाभर आधीच आपले ड्रेस तयार करून घेतले आहेत. शहागंजातील रत्नाकर तांदळे यांचे दुकान हे नेत्यांचे हुकमी ठिकाण आहे. तांदळे यांनी सांगितले की, पाच जणांची आमची टीम निवडणुकीमुळे पूर्ण बिझी आहे. सहसा डझनावारी ड्रेस शिवून घेतले जातात.