आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Looted Of Canot Trader Looter Be Science Gradute Lady Youth

कॅनॉट प्‍लेसमधील व्यापा-याला लुटणा-या टोळीत विज्ञान पदवीधर तरूणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कॅनॉट प्लेसमधील व्यापार्‍याला लुटणार्‍या तरुणीसह तीन भामट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून नऊ लाख 68 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील तरुणी नीलम बापू खोपणे (20 रा. पुंडलिकनगर) मूळची नगरची असून ती सिडकोतील महाविद्यालयात बीएस्सी तृतीय वर्षात शिकते, तर दोन आरोपी रेकॉर्डवरील असून अन्य दोघे फरार आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, सुमीत गुप्ता यांचे कॅनॉटमध्ये रेडिमेडचे दुकान आहे. 4 एप्रिलला रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करून घरी जात असताना फेमच्या बाजूला थांबलेल्या नीलमने त्यांना लिफ्ट मागितली. टी पॉइंटच्या थोडे पुढे कच्च्या रस्त्यावर जाताच नीलमच्या चार साथीदारांनी कार अडवून गुप्ताला बेदम मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, टायटनचे मनगटी घड्याळ, दोन तोळ्यांचे ब्रेसलेट आणि 4 लाख 53 हजार रुपये रोख तसेच क्रेडिट व डेबिट कार्ड, कागदपत्रे, सॅमसंगचा हँडसेट व व्हेर्णा कार (एमएच 20 बीवाय 2584) पळवून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

वर्णन कामात आले : गुप्तांनी आरोपींचे वर्णन चांगल्या प्रकारे केल्यामुळे या टोळीचा शोध लागू शकला. पोलिसांनी वर्णन मिळताच रेकॉर्डवरील आरोपींची शोधाशोध केली तेव्हा अमोल बाबूराव खोतकर आणि कालेबहाद्दूर ऊर्फ टिकाराम रुखबहादूर शिवजली यांची नावे पुढे आली आणि टोळीचा शोध लागला.

आरोपीची शिर्डी सहल : लुटालूट केल्यानंतर ही टोळी कारसह शिर्डीला गेली व दुसर्‍या दिवशी कारला बनावट नंबरप्लेट लावून ते औरंगाबाद आले. ही कार ते दिवसा हेडगेवार रुग्णालयाच्या पाìकगमध्ये, तर कधी अन्य पार्किंगमध्ये लावत होते. रात्री कार काढून खुलताबाद किंवा आदी ठिकाणी फिरायला जायचे.

गुन्हे शाखेची कारवाई : अमोल आणि कालेबहाद्दूर यांना पूर्वी दुचाकी चोरीप्रकरणी अटक केली होती. तोच धागा पकडून पोलिस उपनिरीक्षक हरीश खटावकर यांच्या पथकाने पाठलाग केला. रेकॉर्डवरचे अमोल आणि कालेबहाद्दूरचा फोटो गुप्ता यांनी ओळखला आणि पोलिसांचे काम फत्ते झाले.

यांनी लावला शोध : लुटल्यानंतर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दरोडेखोराचा शोध घेत असतानाच गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक हरीश खटावकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेखर बिरुटे, पोलिस हेड कॉन्स्टेबल खय्युम पठाण, सय्यद सफियोद्दीन, रामेश्वर कदम, प्रकाश काळे, महिला कॉन्स्टेबल स्वाती बनसोडे शेख बाबर यांनी या टोळीचा शोध लावला.
कोण आहे टोळीतील सदस्य ?
अमोल हा बीएच्या दुसर्‍या वर्षात शिकतो. त्यांचे वडील बाबूराव खोतकर हे प्लॉटिंगचा व्यवसाय करतात, तर नीलम बापू खोमणे हिच्या वडिलांचे निधन झाले असून एक भाऊ मतिमंद आहे. अमोलचे आणि तिचे प्रेमप्रकरण चालू आहे. या दरोड्याची आखणी अमोलची होती. तिचा रोलही अमोलने दिला होता. तिसरा कालेबहाद्दूर ऊर्फ टिकाराम हा कूकचे काम करतो. तो रेल्वेस्टेशन भागात राहतो. तोही अमोलचा मित्र आहे.