Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Lord Parshuram Birthcelebration On 22 To 27 Daily New Program In Aurangabad

आैरंगाबाद- परशुराम जयंतीनिमित्त 22 ते 27 एप्रिलदरम्यान विविध उपक्रम

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 07:48 AM IST

  • आैरंगाबाद- परशुराम जयंतीनिमित्त 22 ते 27 एप्रिलदरम्यान विविध उपक्रम
आैरंगाबाद-भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम २२ ते २७ एप्रिलदरम्यान राबविण्यात येणार आहे. ब्राह्मण समाजाच्या २७ विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संघटनांची समन्वय समिती स्थापण्यात आली असून भगवान परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. “पाणी वाचवा’चा संदेश जन्मोत्सव समिती वर्षभर देणार आहे. सामाजिक उपक्रमांत व्याख्याने, स्पर्धा, रक्तदान शिबिरे, वाहन रॅली असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. जन्मोत्सव केवळ ब्राह्मण समाजासाठी नसून त्यात सर्व समाजातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आले.
याप्रसंगी ब्राह्मण समाज समन्वय समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर, प्रकल्पप्रमुख अनिल खंडाळकर, कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, सचिव मिलिंद दामोदरे, आनंद तांदुळवाडीकर, धनंजय पांडे, प्रमोद झाल्टे, मंगेश पळसकर आदींची उपस्थिती होती. यंदा २७ संघटना एकत्र आल्या आहेत.जन्मोत्सवाच्या तयारीसाठी ७५ जणांची टीम काम करीत असल्याचे सांगण्यात आले.
आठवडाभर विविध उपक्रम : शनिवार(२२ एप्रिल) सायंकाळी ६ ते ९ वाजता तापडिया नाट्यमंदिरात उद्योगावर “बोलू काही- उद्योजकता : काल-आज-उद्या’ या विषयावर डॉ. अजित मराठे यांचे व्याख्यान होईल. याप्रसंगी युनिव्हर्सल प्रोफायलॅक्टिकचे व्यवस्थापकीय संचालक शिरीष बोराळकर, इंड्युरन्स ग्रुपच्या एच. आर. विभागाचे अध्यक्ष मकरंद देशपांडे, समन्वय समितीचे सदस्य प्रमोद झाल्टे, धनंजय पांडे आदींची उपस्थित राहील. रविवार (२३ एप्रिल ) सकाळी ९ ते ४ वाजता दत्ताजी भाले रक्तपेढीच्या आणि ब्राह्मण समाज समन्वय समितीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दत्ताजी भाले रक्तपेढी गारखेडा, कण्व भवन शिवाजीनगर गारखेडा, काळा गणपती मंदिर एन-१ सिडको, नाथ मंदिर आैरंगपुरा, लायन्स ब्लड बँक बाल सदन उस्मानपुरा, हनुमान मंदिर बजाजनगर, पंढरपूर आदी ठिकाणी होईल. याप्रसंगी स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, परशुराम जयंतीचे मुख्य प्रायोजक लक्ष्मीकांत थेटे, लक्ष्मीकांत जयपूरकर, विजय मिश्रा आदींची उपस्थिती राहील. या प्रकल्पाचे समन्वयक परिमल मराठे आणि अतुल जोशी आहेत. महिलांसाठी कलश मंगल कार्यालय, उस्मानपुरा येथे सोमवारी (२४ एप्रिल ) दुपारी ४ ते ७ वाजता डॉ. वृषाली गोविंद जोशींचे ‘सध्याच्या परिस्थितीत आईची अपेक्षित भूमिका त्यासाठी आवश्यक संस्कार’ या विषयावर व्याख्यान होईल. प्रमुख पाहुण्या म्हणून सुषमा बोराळकर राहतील. महिलांसाठी दुपारी ३ ते ४ वाजता ‘पर्यावरण बेटी बचाआे’ या विषयावर रांगोळी स्पर्धा होईल. यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. पूजा थाळी सजावट ते या वेळेत होईल. प्रवेश विनामूल्य असून साहित्य महिलांनी आणावे. यासाठी विजया कुलकर्णी, वनिता पत्की, गीता आचार्य, अनुराधा पुराणिक, मीना झाल्टे, मीनाक्षी देशपांडे या प्रकल्प समन्वयक आहेत. युवक -युवतींसाठी मंगळवारी (२५ एप्रिल) सायंकाळी ५ ते ८ वाजता आयएमए हॉल शनिमंदिर समर्थनगर येथे ‘आपल्या सामाजिक नीतिमूल्यांची बांधिलकी’ या विषयावर सुशील कुलकर्णी यांचे व्याख्यान होईल. याप्रसंगी डॉ. संतोष रंजलकर, रवींद्र मोदी, विनोद मांडे आदी उपस्थिती राहतील. या प्रकल्पाचे समन्वयक आशिष सुरडकर, ब्रह्मनाथ ढोल पथक, भार्गव केसरी ढोल पथक, ब्रह्मशौर्य ढोल पथक नागेश्वरवाडी बजाजनगर आहेत.
“अवतारकार्यांचे सामाजिक संदर्भ’ या विषयावर बुधवारी (२६ एप्रिल) संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा येथे रात्री ८ ते १० या वेळेत जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचे व्याख्यान होईल. याप्रसंगी अनिल पैठणकर सुरेश देशपांडे यांची उपस्थिती राहील. मिलिंद दामोदरे या प्रकल्पाचे समन्वयक आहेत. नीरज वैद्य प्रस्तुत भावगीत भक्तिसंध्याचा कार्यक्रम (२७ एप्रिल) रात्री ८ वाजता संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे समन्वयक आनंद तांदुळवाडीकर राहुल आैसेकर आहेत.
२८ एप्रिलला परशुराम स्तंभाचे पूजन
परशुराम जयंतीदिनी २८ एप्रिल रोजी सकाळी वाजता आैरंगपुरा पोलिस चौकीशेजारी भगवान परशुराम स्तंभाचे पूजन शंकराचार्य करवीर पीठ विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात येईल. याप्रसंगी माई महाराज, जगद््गुरू आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज, योगिराज महाराज पैठणकर आदींची उपस्थिती राहील. याप्रसंगी वैभव मांडे आणि शुभम जोशी यांचा सत्कार करण्यात येईल. सकाळी १० वाजता परशुराम चौकातून चारशे युवकांची भव्य वाहन रॅली काढण्यात येईल.

Next Article

Recommended