आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lottery Sound Of Addiction Took Home Ashok Thief

लॉटरीच्या नादात घरफोडीची लागली लत- घरफोड्या अशोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ऑनलाइन लॉटरी खेळण्यासाठी पैसे लागत असल्याने अशोक सुरासेने घरफोडी करण्यास सुरुवात केली. घरफोडी आणि लॉटरीत नशिबाने साथ दिल्याने या दोन्हीलाच त्याने रोजगाराचे साधन बनवत कोट्यवधींची माया जमवल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

70 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली सुरासेने (42) दिली आहे. तो 20 दिवसांपासून मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात असून शहरात केलेल्या घरफोड्यांचा तपास पोलिस करत आहेत. गुरुवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. अहमदनगरला असताना त्याने काही चोर्‍या केल्या होत्या का, याचाही तपास केला जात आहे. जालना रोडवरील सुंदरवाडी भागात राहताना तो सकाळी घराबाहेर पडल्यानंतर दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे परिसरात दिसत होता. शिवाय सिडको बसस्थानक आणि चिकलठाणा परिसरातील काही लॉटरी सेंटरवरही तो दिसायचा, असे येथील रहिवाशांनी सांगितले. पुढीस तपास उपनिरीक्षक महेश आंधळे करत आहेत.