आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अन् ती रोशन गेटकडे वळाली!, प्रेमप्रकरणातून पोलिस ठाण्यात तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एका गुलाच्या प्रेमप्रकरणातून गुरुवारी दुपारी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तणाव निर्माण झाला. अखेर न्यायालयाने त्यात हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला. विशेष म्हणजे या प्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे युगुल शहर सोडून जाणार होते. मात्र, ही माहिती मुलीच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी उस्मानपुरा पोलिस ठाणे गाठून त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला.

या प्रकाराबाबत कळताच ती मुलगी पोलिस ठाण्यात दाखल झाली. दोन्ही बाजूंकडून अनेक जण जमा झाल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी या तरुणीला न्यायालयात हजर केले. तुला कोठे राहायचे आहे, असे न्यायालयाने विचारताच, मला माझ्या मित्रासोबत जायचे आहे, असे तिने सांगितले.
सिटी चौक भागात मला सोडा, असे ती म्हणाली. मात्र, सिटी चौकात नेमके असे कुठे, म्हटल्यानंतर तिने रोशन गेटला सोडा असे सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात तिला रोशन गेट भागात सोडण्यात आले. त्यानंतर मात्र, या प्रकरणावर पडदा पडला.