आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lover Beating By Relatives Issue At Aurangabad, Divya Marathi

प्रेमविवाह करणार्‍या तरुणाला बेदम मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रेमविवाह करणार्‍या तरुणाला तरुणीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. पिता पोलिस आयुक्तालयात स्टेनो असल्याने पोलिसही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

प्रेमविवाह करणार्‍या दोघांनी सरस्वती भुवन महाविद्यालयातून बी. कॉमचे शिक्षण पूर्ण केले आहे. 27 फेब्रुवारीला दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला, परंतु तरुणीच्या वडिलांना याची माहिती नव्हती. 27 मार्चला याबाबत कळाल्यानंतर वडिलांचा राग अनावर झाला. त्यांनी व तिच्या नातेवाइकांनी शनिवारी दुपारी पेठेनगरातील तरुणाच्या घरी जाऊन त्याला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला घाटीत दाखल करण्यात आले होते. रविवारी त्याची सुटी झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या तरुणाच्या घरावर 10 ते 12 जणांनी पुन्हा तुफान दगडफेक केली. यात घरातील टीव्ही, खिडक्यांच्या काचा इत्यादी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. तरुणाचे कुटुंबीय भयभीत झाले असून त्यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली, पण तरुणीने जेव्हा पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्याकडे फोनवरून व्यथा मांडल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.