आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेयसीच्या घरात प्रियकराचा मृतदेह, दारूमुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रात्रभर दारू पीत पहाटे पुन्हा उरलेली दारू पिऊन तरुणाचा शेजारीच राहणाऱ्या महिलेच्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे न्यायनगर भागात घडली. राजेंद्र दादाराव शेरे (२६, रा. गल्ली क्र. ८, न्यायनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो सदर महिलेसोबत राहत होता. राजेंद्रचा अति दारू प्राशनाने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृत्यूचा अहवाल डॉक्टरांनी राखून ठेवल्याने मृत्यूचे कारण मात्र उलगडू शकले नाही.

राजेंद्र सदर महिला गेल्या अनेक वर्षांपासून सोबत राहत होते. शेजारीच घर असल्याने राजेंद्रच्या घरच्यांनाही याची कल्पना होती. बुधवारी रात्री राजेंद्रने रात्रभर दारू प्यायली. दुसऱ्या दिवशी ड्राय डे असल्याने त्याने गुरुवारसाठीसुद्धा अधिक दारू आणली हाेती. बुधवारी रात्रभर दारू पिऊन जेवण करताच राजेंद्र झोपला. दरम्यान, पहाटे ते ५.३० वाजता सदर महिला पाणी भरण्यासाठी उठली असता राजेंद्रने उठून पुन्हा दारू प्यायली जेवण केले. परंतु काही वेळाने राजेंद्र बेशुद्ध पडला. राजेंद्र बेशुद्ध पडताच महिलेने राजेंद्रच्या घरच्यांना कळवले. त्यानंतर राजेंद्रला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. राजेंद्रला बऱ्याच दिवसांपासून कावीळ असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पुरणसिंग राजपूत करत आहेत. सदर मृत्यूचा अहवाल डॉक्टरांनी राखून ठेवला असून अहवाल येताच मृत्यूचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

राजेंद्रच्या परिवारात एकूण चार भाऊ आई आहे. यापैकी दोन भावांची लग्ने झालेली आहेत. राजेंद्र सदर महिलेच्या नात्याबद्दल घरच्यांना कल्पना होती. परंतु राजेंद्र घरी सहसा जात नसल्याने तसेच सतत भांडत असल्याने घरच्यांशी त्याचा फारसा संवाद नव्हता. सदर महिलेचे आधी लग्न झालेले असताना तिने मुद्दाम राजेंद्रची फसवणूक करून नादाला लावल्याचा आरोप राजेंद्रच्या घरच्यांनी केला आहे. त्याच्या मृत्यूस सदर महिलाच जबाबदार असल्याचा आरोप राजेंद्रचा भाऊ देवेंद्र शेरे यांनी केला आहे.

पेंटिंगचा व्यवसाय
२६वर्षीय राजेंद्र पेंटिंगचे काम करत होता. गेल्या अनेक महिन्यांपासून तो सदर महिलेसोबत राहत हाेता. महिलेचे वय साधारण ३५ ते ४० असून याआधी तिचे लग्न झालेले आहे. पहिल्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून पहिल्या पतीपासून तिला १६ वर्षांचा मुलगा आहे.
बातम्या आणखी आहेत...