आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत उडी मारून युगुलाची आत्महत्या, ३१ डिसेंबरपासून होते बेपत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विहिरीत उडी मारून प्रेमी युगुलाने जीवन संपवले. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. जटवाडा रोडवरील जोगवाडा शिवारातील एका विहिरीत दोघांचे मृतदेह सापडले. जोगवाडा येथील संजय कारभारी जाधव (१९), सविता बनसोडे (१५) अशी त्यांची नावे आहेत. संजय व सविता ३१ डिसेंबरपासून बेपत्ता होते. सविता अल्पवयीन असल्यामुळे तिचे संजयने अपहरण केल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय दोघांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे असे पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक दिवाकर पाटील तपास करत आहेत.