आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिलिंडरसाठी 10 दिवसांचे वेटिंग, मात्र ग्राहकांची गैरसोय नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडरसाठी दहा दिवसांचे वेटिंग असले तरी ग्राहकांची तारांबळ होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. ज्या ग्राहकांकडे केवळ एकच सिलिंडर आहे, त्यांना ते संपताच तत्काळ सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येत आहे. परिणामी दोन सिलिंडर असलेल्या ग्राहकांना बुकिंगनंतर दहा दिवसांनी सिलिंडर मिळत आहे.
गेल्या वर्षी सणासुदीच्या दिवसांत आठ दिवसांचे वेटिंग असूनही ग्राहकांची गैरसोय होत होती. यंदा मात्र कंपनीच्या आदेशाप्रमाणे ५० टक्के ग्राहकांना दुसरे सिलिंडर देण्यात आले आहे. त्याचबरोबर वर्षाला बारा सिलिंडर मिळणार असल्याने महिन्याला एक याप्रमाणे नियोजन करून पुरवठा करण्यात येत आहे. मात्र एक सिलिंडर असलेल्या ग्राहकांना तत्काळ सिलिंडर देण्याची जबाबदारी एजन्सीवर आहे.
तारांबळ नाहीच
सध्या दहा दिवसांचे वेटिंग आहे. मात्र ग्राहकांनी घाई करण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे एक सिलिंडर आहे, त्यांना तत्काळ सिलिंडर उपलब्ध होत आहे. दुसरे सिलिंडरही वेळेत मिळेल. मंगेश आस्वार, संचालक, मंगेश गॅस एजन्सी