आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Luxuri Bus And Truck Accident On Aurangabad Pune Highway

नगर-औरंगाबाद महामार्गावर उभ्या बसवर ट्रक धडकला; दोघे गंभीर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- नादुरुस्त खासगी आराम बसवर भरधाव आयशर ट्रक धडकून दोघे जण गंभीर जखमी झाले. नगर-औरंगाबाद महामार्गावर लिंबेजळगावजवळ बुधवारी (25 सप्टेंबर) पहाटे पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. रामराव बाजीराव देशमुख (48 रा. येरमाळा, जि. बुलडाणा), रामू सुधाकर चिडे (30, रा. इसारवाडी, चिखली) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खासगी प्रवासी वाहतूक करणारी रॉयल ट्रॅव्हल्सची आराम बस (एमएच 23 डब्ल्यू 1991) पुण्याहून प्रवासी घेऊन औरंगाबादला येत होती. लिंबेजळगावलगत ती पंक्चर झाली. बसमधील सर्व प्रवासी खाली उतरवून रामराव देशमुख व राजू चिडे हे चालक व क्लिनर बसचे पंक्चर चाक क ाढून दुसरे बसवत होते. तेव्हा भरधाव वेगाने आलेला विनाक्रमांकाचा आयशर ट्रक या बसवर धडकला. त्यात चालक व क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वाळूज पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.