आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डच्या अध्यक्षपदी एम. एम. शेख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष, माजी आमदार एम. एम.शेख यांची बिनविरोध निवड झाली. शनिवारी मुंबई येथे झालेल्या निवडणुकीत शेख आणि मौलाना गुलाम वस्तान्वी यांचा अर्ज होता. परंतु वस्तान्वी याचा अर्ज बाद ठरल्यामुळे शेख बिनविरोध निवडून आले. सन २००० मध्ये या बोर्डाची स्थापना झाली. २००२ मध्ये अध्यक्षपदाची पहिली निवडणूक झाली. अध्यक्षपदाचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो. परंतु त्यानंतर निवडणूक झालीच नव्हती. शेख बोर्डाचे दुसरे अध्यक्ष आहेत.
बातम्या आणखी आहेत...