आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा क्लब तर्फे तिरंगा महोत्सवाचे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ह्यिदव्य मराठीह्ण मधुरिमा क्लब, माहेश्वरी बहू मंडळातर्फे शनिवारी (२३ ऑगस्ट) तिरंगा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महेश भवन, रंगार गल्ली येथे दुपारी तीन ते सहा या वेळेत हा शानदार महोत्सव रंगणार आहे. महिला आणि युवतींमध्ये अनेक सुप्त गुण असतात. मात्र, त्यांना दर्जेदार, व्यापक स्वरूपाचे व्यासपीठ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन ह्यिदव्य मराठीह्ण मधुरिमा क्लबने या महोत्सवाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यातील गुणांचे कौतुकही व्हावे, असा आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
त्यात देशभक्तिपर गीत, तिरंगा पुलाव डेकोरेशन, तिरंगी रंगोली डेकोरेशन, तिरंगा चुडी डेकोरेशन अशा स्पर्धा होणार आहेत. दुपारी चार वाजता होणाऱ्या देशभक्तिपर समूह गीत स्पर्धेत सादरीकरणासाठी चार मिनिटांचा वेळ राहणार आहे. एका संघात कमीत कमी तीन जण आवश्यक आहेत. तिरंगी वेशभूषा बंधनकारक आहे. वेशभूषेला स्वतंत्र पारितोषिकही दिलेजाणार आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या तिरंगा पुलाव डेकोरेशन स्पर्धेसाठी खाद्यपदार्थ घरूनच आणायचा आहे. त्याची रेसिपी िलहून ठेवायची आहे. टेस्ट आणि प्रेझेंटेशनवर परीक्षक गुण देणार आहेत. खाद्यपदार्थ तिरंगीच असले पाहिजेत. तिरंगी रंगोली डेकोरेशन स्पर्धाही दुपारी तीन वाजता होणार असून त्यासाठी ४० मिनिटांचा वेळ िदला जाणार आहे. रांगोळीत तिरंगी रंगासोबत चक्राचा रंगही चालणार आहे. कृत्रिम वस्तूंचा वापर करून रांगोळी रेखाटलेली चालणार नाही. या वेळी तिरंगी चुडी स्पर्धाही होणार आहे. सांची लेडीज कलेक्शन, सोनी फूड प्रॉडक्टस््च्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवात िवजेत्यांना सुवर्ण आभूषण तसेच सोनपरीच्या वतीने आकर्षक बक्षिसे िदली जाणार आहेत. नाव नोंदणीसाठी अर्चना तोष्णीवाल (८८८८०४२००८), पूनम सारडा (९३७३०६०८४९), अश्विनी (९४०३५३२२४६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.