आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: मांगीरबाबा यात्रोत्सव सुरू; पहिल्या दिवशी १८३५ बोकड ६५६ कोंबड्यांचा बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - शेंद्राकमंगर येथील मांगीरबाबाच्या यात्रेस गुुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी १८३५ बोकड ६५६ कोंबड्यांचा बळी तसेच ५०९ भाविकांनी गळ टोचून घेत आपला नवस पूर्ण केला. या वेळी आंध्र प्रदेश कर्नाटक आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी मांगीरबाबाचे दर्शन घेतले.

मांगीरबाबा हे मातंग समाजाचे श्रद्धास्थान आहे. येथे येणारा प्रत्येक जण आपला नवस पूर्ण करतो. प्रामुख्याने तीन दिवस ही यात्रा चालते. बुधवारी मध्यरात्री जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या हस्ते मांगीरबाबाची आरती करण्यात आली. या वेळी फौजदार प्रिया थोरात, सरपंच कडूबाई कचकुरे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. शुक्रवारी पहाटे देवीचे सोंग निघेल.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर छायाचित्रे... (सर्व छायाचित्रे : अरुण तळेकर.)