आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maha Govt Swayamsiddha Program Says Pankaja Munde

स्वयंसिद्धाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा प्रयत्न : मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विभागीय क्रीडा संकुलातील शिबिरात योगासने करताना युवती. - Divya Marathi
विभागीय क्रीडा संकुलातील शिबिरात योगासने करताना युवती.
औरंगाबाद - स्वयंसिद्धाही महिला आणि युवतींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी शासनाची उत्कृष्ट योजना आहे. या माध्यमातून तयार होणाऱ्या मास्टर ट्रेनर यांच्यासाठी स्वयंरोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे. यासाठी लवकरच सुधारित अध्यादेश काढण्यात येईल, असे महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
क्रीडा संकुलात सुरू असलेल्या शिबिरात १५० युवतींनी सहभाग घेतला. मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी त्यांना स्वसंरक्षणासाठी ज्युडो, योगा, कराटे, तायक्वांदो, एरोबिक्स, लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले जात आहे. आरोग्य, कायदा, स्वयंप्रेरणा, स्वयंविकास आदींचे कौशल्य शिकवले जात आहेत. शिबिरात प्रशिक्षक सुनीता पाटील, खुशबू चोपडे, सुरेखा गिरी, लता कलवार, पर्वत कासुरे, पोलिस उपनिरीक्षक सुनीता आढे, डॉ. माया इंदूरकर, योगातज्ज्ञ डॉ. वैशाली तौर यांनी मार्गदर्शन केले.

अडीच लाख मुलींना प्रशिक्षण
महाराष्ट्रातआतापर्यंत अडीच लाख मुलींना स्वयंसिद्धाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले असून अद्यापही प्रशिक्षणाचा हा कार्यक्रम सुरू आहे. प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढत आहे. गेल्या आठ महिन्यांत सहा विभागांत ही शिबिरे घेण्यात आल्याचे अभियानाच्या राज्य भरारी पथक प्रमुख तथा सहायक संचालक कविता नावंदे म्हणाल्या.