आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ग तीनचे कर्मचारी लाचखोरीत अव्वल; महसूल- पोलिसांत स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महसूल आणि पोलिस खात्यामध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. मागील नऊमाहीत एकूण ९४३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले. यात ४२२ जण या दोन विभागांतील, तर अन्य ३९ विभागांतून ५२१ कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक जानेवारी ते २६ नोव्हेंबर २०१६ दरम्यानच्या कारवाईची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यावरून हे उघड झाले आहे. लाच प्रकरणात अडकलेल्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असली तरी पोलिस कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला. या दोन विभागांनंतर पंचायत समिती, महावितरण आणि शिक्षण विभागाचा क्रमांक लागतो. विभागवार विचार करता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा, अपसंपदा आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणात मुंबईमध्ये ५१, औरंगाबाद ९९, ठाणे ८८, पुणे १४२, नाशिक १०७, नागपूर १०४, अमरावती, नांदेडमध्ये प्रत्येकी ८५ असे एकूण ७३१ गुन्हे नोंदवले.

लाच देणारेही तेवढेच जबाबदार
भ्रष्टाचाराच्या विरोधात नागरिक उभे राहत नाहीत तोपर्यंत भ्रष्टाचाराचे उच्चाटन होणार नाही. महसूल, पोलिस विभागाशी जनतेचा संपर्क असल्याने दोन्ही खात्यात भ्रष्टाचाराची अधिक प्रकरणे दिसतात. लगेच काम करण्यासाठी अनेक जण स्वत:हून लाच देतात. हे लोकही भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत. लाचेची तक्रार करण्यासाठी तक्रारीसाठी अॅप, हेल्पलाइन क्रमांक १०६४ उपलब्ध आहे. - प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक.

लाच घेण्यात बाबूंची आघाडी : लाच प्रकरणांमध्ये वर्गनिहाय पाहिले तर वर्ग-३ चे ६५४ कर्मचारी लाचेच्या सापळ्यामध्ये अडकले. वर्ग-२ चे ५४ अधिकारी व वर्ग-१ च्या ५२ अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या तुलनेत वर्ग ४ च्या केवळ ४७ कर्मचाऱ्यांनी लाच घेतली.
बातम्या आणखी आहेत...