आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi, BJP Shiv Sena

युतीतील वादामुळे कार्यकर्ते अस्वस्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - भाजप-शिवसेनेची युती व्हावी ही कार्यकर्त्यांची इच्छा असून युती तुटणार असल्याची बातमी आल्यापासून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची काळजी वाढल्याचे दिसून आले. युतीचा उमेदवार कोण असणार, हा पाहिजे तो नको अशा चर्चांचे फड रंगत असताना शुक्रवारी दिवसभरात युतीमधील तणावाच्या बातम्या येण्यास सुरुवात झाल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. येथील भाजपच्या कार्यालयात असलेल्या टीव्हीसमोर कार्यकर्ते बसून होते. त्यांच्या चेह-यावरील काळजी स्पष्ट दिसत होती. दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यालयातही अशीच परिस्थिती होती.
ग्रामीण भागातील कार्यकर्ते वरिष्ठ पदाधिका-यांशी संपर्क साधून काय होणार याबाबत विचारणा करीत होते. कसेही करा, युती तुटू देऊ नका असे आर्जवही सुरू होते. गावपातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांची सारखीच मानसिकता दिसून येत आहे. परंतु अतिवरिष्ठ पातळीवर हे सर्व सुरू असल्याने आपण काहीही करू शकत नसल्याने कार्यकर्ते, पदाधिका-यांच्या चेह-यावर अगतिकता दिसून आली. युतीसंदर्भात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी सांगितले की हे दोन वेगळे पक्ष असल्याचे आम्हाला कधी वाटतच नाही.
ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये वाद होतात. वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर एकोप्याने निवडणुका लढतो. ब-याचदा महत्त्वाकांक्षी पुढारी बंडखोरी करतात, परंतु कार्यकर्ते मात्र एकदिलाने युतीचा प्रचार करतात. स्वप्नातही वाटले नव्हेते ते आज घडताना दिसते आहे. हे काही बरे नाही. भगवा फडकला पाहिजे ही आस मनाशी बाळगून जिवाचे रान करणारे आम्ही कार्यकर्ते. विधानसभेची तयारी सुरू असताना असे घडणे दुर्दैवी असल्याचे अनेकांचे मत होते.