आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi, Paithan Assembly Seat

विधानसभेची रणधुमाळी: पैठण विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या पैठण तालुक्यातील माजी आमदार संदिपान भुमरे यांच्या १५ वर्षांच्या आमदारकीला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुंग लावतमागील निवडणुकीमध्ये येथील िवधानसभेची जागा काबीज केली. मात्र, यंदा राष्ट्रवादीसमोर आपली ही जागा कायम ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादीमधील इच्छुकांची वाढलेली संख्या, मनसेच्या ताब्यात गेलेली पंचायत समिती, अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या व िमत्रपक्ष काँग्रेससोबत असणारी आघाडी कायम राहाणार की नाही यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे यंदाची पैठण विधानसभेची िनवडणूक अिधकच रंगतदार होण्याची िचन्हे आहेत.

२००९ च्या निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व मनसे अशी ितरंगी लढत पाहावयास िमळाली होती. यामध्ये िशवसेनेचे उमेदवार संिदपान भुमरे यांचा १४ हजार मतांनी पराभव झाला होता, तर मनसेचे डॉ. सुनील िशंदे हे ितस-या क्रमांकावर राहिले होते.
मात्र, मागील पाच वर्षांमध्ये संत एकनाथ कारखाना व पंचायत समितीच्या माध्यमातून संिदपान भुमरे व िज.प.च्या अर्थ व बांधकाम िवभागाच्या माध्यमातून मनसेचे डॉ. सुनील शिंदे यांनी पैठण तालुक्यात आपला संपर्क चांगल्या प्रकारे वाढवला आहे. िशवाय यंदा पंचायत समितीदेखील मनसेच्या ताब्यात गेल्याने मनसे उमेदवारांच्या अाशा वाढल्या आहेत.
यंदा अपक्ष उमेदवारांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता असून िज.प. समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाबासाहेब पवार, जायकवाडी पाणीप्रश्नावरून प्रकाशझोतात आलेले जयाजी सूर्यवंशी यांचा प्रामुख्याने अपक्षांच्या यादीत समावेश असण्याची शक्यता आहे. शिवसेनेत भुमरे आिण खैरे गटाचा वाद मिटलेला असल्याचे भासवले जात असले तरीदेखील िशवसेनेतही बंडखोरीची शक्यता नाकारता
येत नाही.

२००९ चे बलाबल
संजय वाघचौरे - राष्ट्रवादी ६४,१७९
संदिपान भुमरे - िशवसेना ५०,५१७
डॉ. सुनील शिंदे - मनसे २४,७७८
प्रल्हाद राठोड - बसपा ७,९२५

बंडखोरीने प्रमुख दावेदारांची डोकेदुखी वाढणार
२००९ च्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीमध्ये सेना, राष्ट्रवादीसमोर बंडखोरांचे आव्हान असणार आहे. पैठणमध्ये चौरंगी लढत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. मुख्य लढत ही सेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये होणार हेही निश्चित मानले जाते. शिवसेनेचा कोणीही उमेदवार असला तरी त्यांना बंडखोराचा सामना या ठिकाणी करावा लागणार आहे. या ठिकाणी भुमरे-खैरे वाद कायम असल्याने भुमरेंना उमेदवारी मिळाली तर दुसरा गट येथे बंडखोरीच्या तयारीत आहे. भुमरेंना सेनेने डावलले तर तेदेखील बंडखोरी करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात आहे.