आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014 News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैसे वाटल्याच्या संशयावरून उमेदवार पोलिस ठाण्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - आघाडीतील जागावाटपचा तिढा कायम असताना पैठण येथील कॉँग्रेसचे पदाधिकारी बाबासाहेब पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. मात्र, अर्ज भरल्यानंतर काही वेळातच पैसे वाटल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चार तास बसून ठेवले.

बाबासाहेब पवार यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता कार्यकर्त्यांसह बैलागाडीतून मिरवणुकीद्वारे अर्ज दाखल केला. त्यांनतर ते शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यासाठी बैलगाडीने येत होते. त्यादरम्यान पैठण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने फोन करून पवार मिरवणुकीतील कार्यकर्त्यांना पैसे वाटत असल्याची पोिलसांना माहिती दिली.
त्यावर पैठण पोलिसांनी तत्काळ मिरवणुकीचे ठिकाण गाठून बाबासाहेब पवार यांना ताब्यात घेतले व चार तास त्यांची कसून चौकशी केली. मात्र, त्यांनी पैसे वाटप केले नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना संध्याकाळी साडेसहा वाजता सोडण्यात आले.
केवळ एका अज्ञात व्यक्तीच्या फोनवरून पोलिसांनी बाबासाहेब पवार यांना डांबून ठेवले होते. शिवाय पवार यांच्यावरोधात पोलिसांमध्ये कोणीही तक्रार दाखल केलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस निरीक्षक पी. एस. काकडे यांनी निनावी फोनमुळे पवारांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. बाबासाहेब पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या आचारसंहिता पथकाने सौम्य लाठीचार्ज केल्याने काही काळ कार्यकर्त्यांची धावपळ होऊन दहशत निर्माण झाली होती. चार तास पोलिस स्टेशनमध्ये बसवल्यानंतर शेवटी पैसे वाटप केले नाही, असे बाबासाहेब पवार यांच्याकडून लेखी लिहून घेतले.

माझ्या विरोधकांनी खोटी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनीदेखील मला तत्काळ ताब्यात घेतल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. हा माझ्या विरोधकांचा डाव आहे. - बाबासाहेब पवार, माजी पं. स. उपसभापती
छायाचित्र: कारवाई संशयास्पद
बाबासाहेब पवार यांना काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेली नसताना व तशा कोणत्याही सूचना केलेल्या नसतानादेखील पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवाय त्यांच्या मिरवणुकीत काँग्रेस पक्षाचे झेंडेदेखील वापरले हे विशेष.