आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण जाहीर केल्याचा निषेध, कार्यकत्यांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बदनामीकारक लिखाण करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्याबद्दल शिवक्रांती युवा सेनेने सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे क्रांती चौकात दहन केले.

छत्रपतींच्या नावाने सत्ता मिळवणाऱ्या सरकारला त्यांचा विसर पडला आहे का, असा सवाल करताना, बदनामी करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करणे योग्य नसल्याची भावना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कोटकर, राजेश पाटील, लखन चव्हाण, सचिन जाधव, गोरख गिरी, अविनाश काळे या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोडे मारो आंदोलन : बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण जाहीर केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी क्रांती चौकात जोडे मारो आंदोलन केले. पत्रकार परिषदेतही सरकारच्या या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
कार्यकत्यांना अटक

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने निदर्शने करण्यात आली. निदर्शने करणाऱ्या कार्यकत्यांना क्रांतीचौक पोलिसांनी अटक करुन सुटका केली.