आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिनानिमित्त चिंचोलीत श्रयम् फाउंडेशनतर्फे जलसंधारण अभियानात श्रमदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त फुलंब्री तालुक्यातील चिंचोली येथे पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जलसंधारण साक्षरता अभियान आणि श्रमदान अभियान घेण्यात आले. यावेळी पानी फॉउंडेशन च्या मराठवाडा प्रतिनिधी व सिने अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर यांची प्रमुख उपस्थिति होती. "लहान मुलांपासून ते महिला आणि वृद्धापर्यंत दुष्काळा विरुद्ध लढा देणार्यांची धडपड पाहून आम्हालाही एक नविन ऊर्जा मिळत आहे", असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना त्यांनी गावा गावात जाऊन जलसाक्षरता अभियानात भाग घेणाऱ्या श्रयम् फाउंडेशनचे ही विशेष कौतुक केले. या कार्यक्रमात "आम्ही दर रविवारी येऊन श्रमदान करू असे श्रयमचे शुभम् हरणे यांनी बोलताना जाहिर केले.
 
या अभियानात श्रमदान करण्यासाठी रोटरी क्लब चे काही सदस्य तसेच चिंचोली गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. श्रमदान झाल्यानंतर अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर ,पानी फाउंडेशन चे जिल्हा प्रतिनिधी, गावचे सरपंच, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन जल संधारणाच्या आणि श्रमदानाच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आयोजक रामदास मते, अमोल मते, श्रयम् चे शुभम् हरणे, सूरज तावरे ,श्रेया वर्के, आशिष इंगळे, प्रथमेश दिक्षित, गायत्री मराठे, उदय तावरे, माधुरी भुरेवार, आदींनी परिश्रम घेतले. सर्व सहभागी ग्रामस्थांचे आयोजक रामदास मते यांनी आभार व्यक्त केले.
 
बातम्या आणखी आहेत...