आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Democratic Front Program In Aurangabad

लोकशाही आघाडी आगामी निवडणुकीत तयारीने उतरणार, आमदार हरिभाऊ भदे यांचा निश्चय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेस आणि भाजप हे खर्‍या अर्थाने जनतेचे शत्रू असल्याने महाराष्ट्र लोकशाही आघाडी राज्यातील लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागा लढवणार असल्याचे मत भारिपचे अकोल्याचे आमदार हरिभाऊ भदे यांनी व्यक्त केले आहे.

संत एकनाथ मंदिरात मंगळवारी (10 सप्टेंबर) महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या पहिल्या मेळाव्यात ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी निर्माण करण्यात आली आहे. आमदार भदे म्हणाले, नागरिकांना परिवर्तन हवे आहे. मात्र झेंडा हाती घ्यायचा कोणी? अन्यायाची जाण सर्वांना आहे पण वाचा फोडणार कोण? अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आघाडीला यश मिळणार असून हे लावलेले रोपट्याचे वटवृक्ष होणार असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

बजेट तेवढाच भ्रष्टाचार

राज्य सरकारचे जेवढे बजेट आहे. तेवढाच भ्रष्टाचारही होत असल्याचा आरोप आमदार भदे यांनी केला. सर्व जातींच्या विकासासाठी निधी राखीव ठेवला जातो. मात्र त्यामधून विकास कोणाचाच होत नाही. त्यामुळे सर्वजण संताप व्यक्त करतात. त्यासाठी लोकशाही आघाडी गावागावात जाऊन प्रचार करणार आहे.

जनआंदोलनाला चेहरा दिला तर सत्ताबदल

जनआंदोलनाला चेहरा दिला तर सत्ताबदल होतो हा इतिहास आहे. जनतेमध्ये संताप असल्याने आंदोलनाला चेहरा देणे गरजेचे असल्याचे मत अविनाश डोळस यांनी व्यक्त केले. दलित संघटनांनी प्रकाश आंबेडकरांचे व्हिजन समजून घ्यावे. त्यांना केवळ दलितांचे नेते म्हणून त्यांचे अवमूल्यन करू नये, असा सल्लाही त्यांनी संघटनांना दिला.

मेळाव्यात सर्व पक्षांच्या सदस्यांनी परिवर्तन करण्याचा आशावाद व्यक्त केला. महाराष्ट्र लोकशाही आघाडीमध्ये भारिप, जनता दल एस., सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया, लाल निशाण पक्ष, वेल्फेअर पार्टी, ओबीसी फांउडेशन, औरंगाबाद सामाजिक मंच यासारखे 23 पक्ष आणि संघटना सहभागी आहेत. या मेळाव्यात आमदार भदे, अविनाश डोळस, कॉ. भीमराव बनसोड, अजमल खान, विजय दिवाण, अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे, गौतम लांडगे, राकीब अहमद, राहुल डोंगरदिवे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुद्धिनाथ बराळ यांनी केले.

पुढील स्लाइडमध्ये, इस भैस के मुंह पर लाठी मारो !