आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra DGP Pravin Dixit Say, FIR Will In Video Records

एफआयआरचे आता व्हिडिओ रेकॉर्ड; महासंचालक प्रवीण दीक्षित यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एखादा गुन्हा नोंदवल्यावर पोलिस अनेकदा मेहनत करून तपास करतात. आरोपींना पकडतात. मात्र तेव्हा फिर्यादी तक्रार मागे घेण्याच्या तयारीत असतो किंवा पंच तरी जबाब बदलतात. परिणामी दोषसिद्धी होत नाही. त्यामुळे यापुढे पोलिस ठाण्यात नोंदवला जाणारा प्रत्येक गुन्ह्याचा एफआयआर यापुढे चित्रफीत करून नोंदवला जाणार आहे. त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ही माहिती दिली.

‘दिव्य मराठी’ला शुक्रवारी दिलेल्या विशेष मुलाखतीत दीक्षित म्हणाले, अशा डिजिटल रेकॉर्डमुळे फिर्यादी व इतर पुरावे बदलले तरी हा एफआयआर कायम राहील. घटना घडल्यानंतर घटनास्थळाचे शूटिंग केले जाईल. जबाबाचा व्हिडिओ काढला जाईल. तक्रार अर्जही फिर्यादीच्या हस्ताक्षरात घेण्यात येईल तंत्रज्ञानाचा सहजपणे वापर करता येण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देण्याचे सूतोवाच दीक्षित यांनी केले.

पोलिसांबदल्ल विश्वासहार्यात निर्माण करणार
पोलिस दिवसरात्र मेहनत करतात. ते जा समाजासाठी ज्या तळमळीने काम करतात. ती तळमळ समाजापर्यंत पोहचण्याचे काम प्रामुख्याने हाती घेण्यात येणार आहे. जेणे करुन पोलिसांबद्दलची विश्वासहार्यता समाजामध्ये निर्माण होण्यास मदत होईल.