आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Dhangar Community Agitation For Constitutional Rights

अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचा रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - येथील नागपूर-मुंबई महामार्गावरील सावंगी चौकात धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी (21 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता धनगर समाजाचे राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गंगापूरचे नायब तहसीलदार यू. एस. लांडे व शिल्लेगावचे सहायक पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी जय मल्हार सेना संघटनेचे जिल्हाप्रमुख स्वरूपचंद कुकलारे व तालुकाध्यक्ष सोन्याबापू गायके, रमेश पुणेकर, काशीनाथ बडोगे, प्रकाश घिटरे, काशीनाथ कुकलारे, पंच कारभारी गायके, रमेश कोकरे आदी उपस्थित होते. सावंगी चौकात धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे तसेच अनुसूचित जमातीच्या यादीत स्पष्ट उल्लेख असताना मिळणार्‍या सवलतींपासून वंचित ठेवणार्‍यांना आता त्यांची जागा दाखवू, अशा घोषणा देत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याच मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीने 1 डिसेंबर 2012 रोजी राज्यातील सर्व खासदारांच्या घरांसमोर एकदिवसीय आंदोलन करून यासंदर्भात आवाज उठवण्याचा आग्रह धरला होता. त्यांनतर 19 डिसेंबर 2013 रोजी नागपूर येथे झालेल्या अधिवेशानादरम्यान धनगर समाजातील नागरिकांनी मोर्चा काढून धनगर समाजाला सवलतींचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लवकरच केंद्राकडे अभिप्राय पाठवू, असे आश्वासन मोर्चेकर्‍यांना दिले होते. मात्र, अद्यापही आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने शुक्रवारी याविरोधात पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांपर्यंत हा निर्णय घेण्यात आला नाही तर निवडणुकांवर
बहिष्कार टाकू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
टी पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन
फुलंब्री २ धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यात याव्या, या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने फुलंब्री टी पॉइंट येथे रास्ता रोको करण्यात आला. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. गेल्या 65 वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष लहू शेवाळे जिल्हाध्यक्ष शिवाजी काटकर, तालुकाप्रमुख किशोर कुकलारे, सूर्यभान सोनवणे, हौसाबाई काटकर, सुभाष साबळे आदींची नावे आहेत.