आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योग, हॉटेल, बांधकामांचे पाणी बंद करा; पिण्यासाठी पाणी द्या - प्रा. एच. एम. देसरडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उद्योग, पंचतारांकित हॉटेल, पाटर्य़ा, उत्सव, बांधकामांचे पाणी तत्काळ बंद करावे. उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच राखून ठेवावे. वीजटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्यसेवा वगळता मुख्यमंत्री कार्यालयापासून सरसकट एअर कंडिशनचा वापर तत्काळ थांबवावा, असे विविध उपाय अर्थतज्ज्ञ, दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एच. एम. देसरडा यांनी रविवारी (10 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत सुचवले.

पुणे-मुंबईसारख्या शहरांत माणसी 200 लिटर पाणीपुरवठा होतो, तर दुसरीकडे राज्यात लाखो आयाबहिणींना हंडाभर पाण्यासाठी मैलोगणिक भटकंती करावी लागते. केवळ दिवाळखोर धोरणामुळे हे संकट वारंवार ओढवते व तीव्र होते. रोजगार हमी योजनेसाठी 20 हजार कोटी, टंचाई निवारणावर 30 हजार कोटी, पाटबंधारे प्रकल्पांवर 80 हजार कोटी, असा तीन लाख कोटी रुपयांचा खर्च होतो. याखेरीज राज्याचा अर्थसंकल्प तसेच वार्षिक-पंचवार्षिक योजनांद्वारे पाणी-वीज-रस्ते-आरोग्य-आवास व अन्य पायाभूत सुविधांच्या निर्मिती-देखभालीवर मोठा खर्च होतो. या सर्वांची फलर्शुती अपेक्षेनुसार झाली असती तर पाणी-विजेचा प्रश्न तसेच दारिद्रय़-दुष्काळ-कुपोषणाचा प्रश्न एव्हाना इतिहासजमा झाला असता, असे ते म्हणाले. आज 60 टक्के जनतेला पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नाही. खेडीच नव्हे, तर शहरातील अध्र्याधिक लोकांना मलनिस्सारणाच्या सोयी नाहीत. राज्यातील प्रत्येक दुसरे बालक कुपोषित, तर 70 टक्के महिला अँनेमिक आहेत. मानव विकासात महाराष्ट्राचा क्रमांक चौथा-पाचवा आहे. यंदा सरासरीच्या 50 ते 55 टक्के पाऊस झाला. 200-300 मि.मी. पाऊस म्हणजेच हेक्टरी किमान दहा लाख लिटर पाणी पावसाद्वारे पडते.

सद्य:स्थितीत सर्व उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठी वापरावे. साखर, मांस, मद्यार्क, रसायने, ऑटोमोबाइल उद्योगांसाठी पाणी बंद करावे. ऊस, केळी, द्राक्षे आदी पिकांच्या अफाट पाणीवापरावर बंदी, र्मयादा घालावी. बांधकाम परवाने तत्काळ रद्द करावेत. पंचतारांकित हॉटेल, मॉल, लग्न समारंभ आदींच्या पाणीवापरावर बंधने घालावीत, असेही देसरडा म्हणाले.