औरंगाबाद - आचारसंहितेची दोन दिवसांपूर्वी चाहूल लागताच निवडणुकीचे अधिकचे काम टाळण्यासाठी काही सरकारी अधिकार्यांनी आजारी पडण्याचा जुना फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. पाठदुखी, कंबरदुखीसह हृदयरोगाच्या अर्जांचा ओघ निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सुरू झाला आहे.
नेहमीच्या कामाव्यतिरिक्त निवडणुकीचे काम सोपवताना शासनाने हजारो कर्मचार्यांचा प्रत्येकी २० लाखांचा विमाही उतरवलेला असतो. मात्र, खर्याखुर्या आजारी अधिकार्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. काम टाळण्यासाठी बहुतांश अधिकारी वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन स्वत:ची सुटका करून घेतात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामातून जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभागातील काही अधिकार्यांनी हाच फंडा अवलंबल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ड्यूटी रद्द करण्यासाठी पॅकेज : यात लांबची ड्यूटी नको असेल तर अधिकार्यासाठी २५ हजार तर कर्मचार्यासाठी ५ ते १० हजार रुपये दर सुरू असल्याचा आरोप कर्मचार्यांच्या हवाल्याने सामाजिक कार्यकर्ते गंगावणे यांनी केला आहे.
गाड्यांची पळवापळवी नको म्हणून.. ..
इलेक्शन ड्यूटीवर असताना सरकारी वाहने जमा करण्याचे आदेश उच्चपदस्थ अधिकार्यांना असतात. मात्र, गाडी खराब असल्याच्या नावाखाली ती देत नाहीत. तसेच माझ्यापेक्षा कमी पगार असलेला अधिकारी ड्यूटीचे वाॅरंट कसा काय काढू शकतो, असेही आक्षेप ते घेतात. या सर्व प्रकारात सरकारचा वेळ, पैसा आणि शक्ती वाया जाते.
आहेरयांच्याकडून भेटीसाठी टाळाटाळ
यू.के. आहेर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची बाजू घेण्यासाठी प्रयत्न प्रस्तुत प्रतिनिधीने सतत तीन दिवस केला. मात्र त्यांनी भेट टाळत फोन एसएमएसलाही उत्तर दिले नाही.
आहेर यांची तक्रार करणार
निवडणुकीचे काम टाळणार्या अधिकार्यांची नावे मी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे दिली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यू.के. आहेर यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहे. ड्यूटी रद्द करण्यामागे मोठे अर्थकारण असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. - सचिन गंगावणे, सामाजिककार्यकर्ते
होय,माझ्याकडे तक्रार आली...
राष्ट्रीय कर्तव्यात कोणी जाणीवपूर्वक असे प्रकार करत असेल तर सत्यता तपासून कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली जाईल. गंगावणे यांचा अर्ज माझ्याकडे आला असून चौकशी सुरू आहे. - शशिकांत हतगल, उपजिल्हानिवडणूक अधिकारी
निवेदनातील अधिकार्यांची यादी
डी.व्ही. मुसळे, कार्यकारी अभियंता, ल.पा.वि.
प्र.द. वझे, कार्यकारी अभियंता
पी.एस. तांबी, कार्यकारी अभियंता
डी.एस. कासले, उपअभियंता,
व्ही. एन.बडे, उपअभियंता, ल. पा. वि
एम. जी. कप्ते, उपअभियंता, पाटबंधारे मंडळ
जयसिंग हिरे, शाखा अभियंता, कडा
बी. जी. बाभूळगावकर, सहायक अभियंता
डी.जी. जोशी, शाखा अभियंता
येरमाळकर, उपअभियंता
व्ही. बा. राऊत, शाखा अभियंता
संतोष लोखंडे, भांडारपाल,
आर.बी. देशपांडे, उपअभियंता
दिलीप माणकेश्वर, शाखा अभियंता
एम. आर. जाधव, शाखा अभियंता
एस. एस. आफळे, शाखा अभियंता
श्रीमती वनिता तोंडारे, शाखा अभियंता
प्रमोद गोविंदवार, सहायक अभियंता
२४ वर्षे जबाबदारी टाळण्याचेही प्रकार
तब्बल चोवीस वर्षे इलेक्शन ड्यूटी टाळणार्या अधिकार्यांची यादीच जिल्हाधिकार्यांना सचिन गंगावणे या सामाजिक कार्यकर्त्याने सादर केली आहे. साम, दाम व दंडभेद वापरून दरवर्षी
आपल्या मर्जीतील उपअभियंता व शाखा अभियत्यांची निवडणूक कामे रद्द करणारे अधिकार्यांचे एक रॅकेटच असल्याचा दावा गंगावणे यांनी निवेदनात केला आहे.