आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Electricity Boards Start Load shedding

वीज चोरी + थकबाकी = भारनियमन सुरू!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या पंधरवाड्यात थंडीचा जोर वाढल्याने विजेची मागणी कमी झाली असली तरी ऐन परीक्षेच्या काळात औरंगाबादसह राज्याला भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे. वीज चोरी आणि वीज बिलाची थकबाकी हा आधार मानून जिल्ह्यात ज्या 74 फिडरवर भारनियमन केले जाते त्याचा सर्वाधिक फटका शहर व जिल्ह्याला बसणार आहे.
मागणी घटली तरी ... : थंडी वाढल्यानंतर विजेची मागणी सुमारे एक हजार मेगा वॅटने कमी झाली होती; पण केंद्रीय विद्युत यंत्रणेतील सिपत बिलासपूर विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे 300 ते 500 मेगा वॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला. त्यातच अदानी प्रकल्पातील 660 मेगा वॅटचे दोन संच बुधवारी रात्री अचानक बंद पडले. परिणामी 1600 मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी आपत्कालीन भारनियमन सुरू झाले आहे.
वेळापत्रक जाहीर करण्यास नकार ऐन परीक्षेच्या काळात सुरू झालेल्या भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर करण्यास वीज कंपनीने नकार दिला आहे. ग्रामीण भागात ते 14 ते 16 तास होऊ शकते. सध्या पिके बहरात असल्याने हातचे पीक जाईल या चिंतेने शेतकर्‍यांना ग्रासले आहे.
आपत्कालीन भारनियमन : वीज गळती, थकबाकी जास्त असलेल्या ठिकाणी 20 फेब्रुवारीपासून भारनियमन होत आहे. त्याचे वेळापत्रक देता येणार नाही, असे महावितरणचे मुंबईचे जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे म्हणाले.
22 फिडर भारनियमनमुक्त
मागणी-पुरवठा संतुलनासाठी जिल्ह्यात असलेल्या 94फीडरपैकी 22 भारनियमनमुक्त असले तरी 74 फीडरवर वीज चोरी व थकबाकीआधारे भारनियमन होते. नव्या लोडशेडिंगचा भार याच फीडरवर. परिणामी शहरासह ग्रामीण भागाला फटका बसेल.
मालमत्ता कर वाढणार : मालमत्ता करात 21.5 टक्के वाढीचा पालिकेचा प्रस्ताव असून याचा मोठा भुर्दंड नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.