आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Govt To Receive Irrigation Scam Report On Wednesday News In Marathi

सिंचन घोटाळ्यावर चितळे समितीचा अहवाल सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा 800 पानी अहवाल बुधवारी वाल्मीचे मुख्य अभियंता ए. एस. ननावरे यांना सादर केला, अशी माहिती माधवराव चितळे यांनी दिली. अहवाल तयार करण्यासाठी 14 महिने लागले. दरम्यान, युतीच्या काळातील कामांचा यात समावेश करण्यात यावा, असा दबाव समितीवर मंत्र्यांच्या माध्यमातून टाकण्यात आला होता, मात्र चितळे त्याला बळी पडले नाहीत, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी शासनाने माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मात्र, समितीचे अधिकार आणि कार्यकक्षेबाबत वाद निर्माण झाला होता. त्यामुळे समितीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. बुधवारी रात्री झालेल्या सदस्यांच्या बैठकीत 800 पानांचा अहवाल सादर करण्यात आला.

समितीवर मंत्र्यांचा दबाव
चितळेंच्या अहवालासंदर्भात कार्यकक्षा कमकुवत होत्या. भाजपने दिलेल्या पुराव्यांच्या माध्यमातून सत्यता पुढे आली. अहवालाच्या संदर्भात चितळे समितीवर दबाव आला होता; पण समितीने त्यांना भीक घातली नाही.
विनोद तावडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद