आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Govt Will Solve #ShaniShingnapur Issue, Says CM

#ShaniShingnapur, भूमाता ब्रिगेडच्या देसाईंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व इतर महिलांनी आज सायंकाळी चारच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. - Divya Marathi
भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व इतर महिलांनी आज सायंकाळी चारच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली.
औरंगाबाद/पुणे- भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व इतर महिलांनी आज सायंकाळी चारच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. शनी शिंगणापूर येथील शनी मंदिरात पुरुषाप्रमाणेच महिलांनाही चौथ-यावर जाऊन दर्शन घेता आले पाहिजे अशी मागणी तृप्ती देसाईसह महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देसाई यांना मी तुमच्याच भूमिकेचा आहे असे सांगत समर्थन दिले. तसेच शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना दर्शन घेता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. विश्वस्तांनी आपली भूमिका बदलत भूमाता ब्रिगेडशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
आम्ही हाती घेतलेल्या मोहिमेला व आंदोलनाला यश मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आमच्या मागण्याचे निवेदन दिले आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा पत्र लिहणार आहोत. देशात, राज्यात नविन कायदा बनवावा, महिला व पुरुषात धार्मिक स्थळी भेदभाव होणार नाही असा कायदा सरकारने आणावा असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे तृप्ती देसाई यांनी सीएम भेटीनंतर सांगितले. शनी शिंगणापूर येथील मंदिर प्रशासनाने हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा व आम्हाला चर्चेस बोलवावे तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक शनि मंदिरातील चौथा-यावर दर्शन घ्यावे अशी मागणी तृप्ती देसाई यांनी निवेदनात केली आहे.
महिलांना देवळात पूजा करण्याचा अधिकार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी शिंगणापूर मंदिर प्रशासन आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये चर्चा घडवून आणणार असल्याचे मंगळवारी सांगितले होते. मंदिरातील महिलांच्या प्रवेशावर असलेल्या बंदीवर सर्वमान्य तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनीही तोडग्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महिलांच्या बाजूने आपले वजन टाकले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने महिलांना अनुकूल अशी भूमिका मांडली आहे.
राम शिंदे म्हणाले, की सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी मंदिर प्रशासन आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी सरकार मध्यस्थी करणार आहे. कायदा हातात घेतल्याने रणरागिणी भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. मंदिर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले होते. महिलांच्या धार्मिक भावनांचा विचार केल्यास यावर तोडगा काढणे ही सरकारचे कर्तव्य आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, यावर काय म्हणाले भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी...राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेसुद्धा मांडली अनुकूल भूमिका...