आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Home Minister R. R. Patil Oppose Police Patil Strike At Kannad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गृहमंत्र्यांच्या निषेधार्थ पोलिस पाटलांचे उपोषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड: राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत पोलिस पाटलाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटना कन्नड शाखेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
गृहमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत पोलिस पाटील या पदाचा उपयोग पोलिसांना व्हावा. यासाठी करण्यात आला होता मात्र, पोलिस प्रशासनास या पदाचा कुठल्याच प्रकारचा फायदा होत नसल्याने येत्या 15 दिवसांत हे पद गोठवणार असल्याची माहिती दिली. या वक्तव्याच्या निषेधार्थ पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष साहेबराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून नायब तहसीलदार एन. बी. उपाध्ये यांना निवेदन दिले.
या वेळी नारायण निकम, उत्तम तागवाले, मन्सब अली, रामराव घुगे, काकासाहेब पवार, जगन राठोड, रामजी राठोड, वसंत थेटे, यशवंत शेळके, आदी उपस्थित होते.