आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Is All Set For Shri Ganesha Immersion

PHOTOS : राज्‍यभर भक्‍तीला उधाण, शांततेत झाले गणेश विसर्जन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्‍हापुरात खंडोबा, म्‍हसोबाच्‍या वेशभूषेत सहभागी भाविक. - Divya Marathi
कोल्‍हापुरात खंडोबा, म्‍हसोबाच्‍या वेशभूषेत सहभागी भाविक.
पाहाता पाहाता 10 दिवस सरले. आपल्‍या लाडक्‍या बाप्‍पांना निरोप देण्‍याची वेळ समीप आली. त्‍या अनुषंगाने 'पुढच्‍या वर्षी लवकर या' च्‍या गजरात राज्‍यातील प्रमुख शहरे, जिल्‍हा ठिकाण, तालुक्‍यांची गावे यासह ग्रामीण भागातही विसर्जन मिरवणुका निघाल्‍यात. त्‍याचाच हा वृत्‍तांत
मराठवाड्यात मिरणुकीला सुरुवात
औरंगाबाद - ढोल ताशांना निनाद, उधळला जाणारा गुलाल, डीजेच्‍या तालावर थिरकणारी पाउले अशा उत्‍साहात मराठवाड्यात औरंगाबादसह नांदेड, लातूर, परभणी, बीड, उस्‍मानाबाद, हिंगोली, जालना या जिल्‍ह्यात विसर्जन मिरणुकीला सुरुवात झाली आहे. दुपारनंतर बाप्‍पांचे विसर्जन करण्‍यात आले.

कोल्हापुरात बाप्पांच्या मिरवणुकीत खंडोबा, म्हाळसा
कोल्‍हापूर - कोल्‍हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर या जिल्‍ह्यांतही बाप्‍पांच्‍या मिरवणूक निघाली. अहमदनगरमध्‍ये बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी कल्याण रोड वरील बाळजीबुवा विहीर व सावेडी येथील यशोदा नगर परिसरातील विहिरीवर गणेश भक्तांची गर्दी केली होती. कोल्हापूरचा राजाही पारंपरिक पद्धतीने मार्गस्थ झाला होता. ढोल-ताशा पथकं बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालीत दरम्‍यान, मिरणुकीमध्‍ये खंडोबा, म्हाळसाच्‍या वेशभूषेत भाविक सहभागी झाले होते.
विदर्भातही शांततेत विसर्जन
नागपूर -
विदर्भातही लाडक्‍या गणेशाला निरोप देण्‍यासाठी नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, बुलडाणा, भंडारा, गोदिंया, वाशीम, गडचिरोली, खामगाव येथेही मिरवणूक काढली गेली. गृहिणींनी मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढली होती. गुलाल उधळला गेला. दरम्‍यान, राज्‍यात सर्वाधिक काळ चालणारी मिरणूक म्‍हणून मान असलेल्‍या वाशीमच्‍या गणेश मिरवणुकीलाही सकाळी 8.30 वाजता सुरुवात झाली. ही मिरवणूक तब्‍बल 48 तास चालते. खासदार भावना गवळी, पोलिस अधीक्षक विनीता साहू, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक यांनी शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्याचे पूजन केल्‍यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. दरम्‍यान, ढोल ताशांच्‍या तालावर खासदार गवळी यांचे पाय थिरकले.
कोकणात पारंपारिक वेशभूषेत कोळी बांधव
ठाणे -
कोकणातही ठाणे, रत्‍नागिरी, रायडल, पनवेल येथे मिरणुकीला थाटात सुरुवात झाली. दरम्‍यान, कोळीबांधव पारंपारिक वेशभूषेत या मिरवणुकीमध्‍ये सहभागी झाले होते.
उत्‍तर महाराष्‍ट्रात रस्‍त्‍यावर गर्दी
नाशिक -
उत्‍तर महाराष्‍ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, धुळे या जिल्‍ह्यांतही विसर्जन मिरणूक निघाली. दरम्‍यान, अर्ध्‍यापेक्षा अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन करण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज..