आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Leader's Ready To Loksabha And Vidhansabha Election

चिंतित काँग्रेस, गांगरलेली शिवसेना आणि आशावादी भाजप; राजकीय पक्षांची नव्या गणिताची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिल्लीसह चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय पक्षांनाही बदलत्या वार्‍यांची दखल घ्यावी लागली आहे. सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसला नव्याने रणनीती करावी लागण्याची भीती वाटत आहे, तर नरेंद्र मोदींमुळे भाजपमध्ये आशादायी वातावरण असताना शिवसेना मात्र अद्याप गांगरलेल्याच अवस्थेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली असून काँग्रेससोबत गेल्याने होणारा तोटा समोर दिसत असल्याने त्यांच्याही गोटात चिंतेचे वातावरण आहेच.
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झाले तेच राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, छत्तीसगडच्या निवडणूक निकालांनी. चार महिन्यांवर लोकसभा निवडणुका आणि दहा महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्याने या चार राज्यांच्या निकालांच्या माध्यमातून जनमताचा कौल समोर आल्याने राजकीय तंबूत चर्चा सुरू होती. विविध पक्षांच्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर बहुतेकांनी आपण आणि आपला पक्ष तयारीला लागत असल्याचे सांगतानाच रणनीतीतही बदल करावे लागणार असल्याचे सूचित केले.

पुढील स्लाइडमध्ये, बाळासाहेब नसणे ही सर्वात उणी बाजू