आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत मनसेचे खड्डय़ांत ‘होडी सोडा’ आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील रस्त्यांची चाळणी झाली तरी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मात्र, मनसेच्या आंदोलनाच्या धसक्याने छावणी परिषदेने आंदोलनाच्या चार तास अगोदर मुरूम टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. मनसेने सोमवारी (5 ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता छावणीतील नेहरू चौकात खड्डय़ांत ‘होडी सोडा’ आंदोलन केले.

बीबी-का-मकबरा, सोनेरी महल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, हनुमान टेकडी अशा महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाली होती. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यासंदर्भात वारंवार निवेदन देऊनही प्रशासन याकडे कानाडोळा करत होते. त्यामुळे मनसेने हे आंदोलन केले. मात्र, वर्तमानपत्रांत आंदोलनाच्या बातम्या प्रकाशित होताच छावणी परिषदेला जाग आली. आंदोलनाच्या दिवशी सकाळपासूनच या भागातील मुख्य रस्त्यावर मुरूम टाकण्यास सुरुवात केली.

मनसेच्या पदाधिकार्‍यांनी या घटनेचा निषेध करत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. रस्त्यावरील पाणी साचलेल्या खड्डय़ांत होड्या सोडल्या.

सामान्य नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या वेळी शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, उपाध्यक्ष गौतम आमराव, विभाग अध्यक्ष बिपिन नाईक, सचिव गजानन गौडा पाटील, आशिष सुरडकर, निनाद खोचे, राजीव ठाकरे, नीलेश धारकर, मयंक पांडे, प्रवीण अवसरे, रवी वर्मा, सय्यद फिरोज, राजेश नवहाते, अरविंद शेलार, गणेश गंजरा, कन्हैया मोरेलू, अजिंक्य धारकर, ओंकार सिंग, महेंद्र बचके, पप्पू खरे, विवेक धानुका, राहुल धारकर, सागर मिसाळ, प्रेमनाथ डवणे आदींची उपस्थिती होती.