आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती महिला पडल्याने नऊ महिन्याच्या गर्भाचा मृत्यू, जुळ्या बहिणी गेल्या वाहुन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद वगळता सहा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने आज (शनिवार) विश्रांती घेतली आहे. 24 तासांहून अधिककाळ झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. दोन दिवसांच्या पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. औरंगाबाद शहरातील मकबरा परिसरात एक गर्भवती पाय घसरून पडल्याने नऊ महिन्याचे अर्भक दगावले. याला प्रशासन जबाबदार असल्याचा पित्याचा आरोप आहे.

जुळ्या मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या
विदर्भात सध्या पावसाचा कहर सुरु आहे. मुसळधार पावसामुळे गोंदियात आईसह दोन वर्षांच्या जुळ्या मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. आईचा मृतदेह सापडला असून एक मुलगी अद्याप बेपत्ता आहे. तर एका मुलीला वाचवण्यात यश आलं आहे.

गर्भाचा मृत्यू
औरंगाबाद शहरातील काही दिवसांपासून गाजत असलेल्या वादग्रस्त भूखंड प्रकरणाने काल एका अर्भकाचा बळी घेतला. अंधार असल्याने पाय घसरून पडल्यामुळे गर्भवती महिलेच्या पोटातील चिमुकल्याचा बळी गेला आहे. पहाडसिंगपूरा परिसरातील बेघर झालेल्या मजूर दाम्पत्याने सीलबंद केलेल्या घरासमोरच पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला होता. कालच्या पावसात गर्भवती महिला रात्री आठच्या सुमारास घसरून पडली. रात्री येथून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे सुभाष कटक आणि त्यांची गर्भवती पत्नी सुरेखा सकाळी घाटी हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी तपासणी करुन पोटातील गर्भ दगावल्याचे सांगितल्यानंतर या दम्पत्याच्या पायाखालून जमीन सरकली.
माझ्या बाळाचा प्रशासनाने बळी घेतल्याचे सुभाष कटक म्हणाले. दोन मुलींच्या पाठीवर गर्भवती राहिलेल्या सुरेखा यांच्या पोटात मुलाचा गर्भ होता. सुभाष यांनी इवल्याशा बाळाचे कलेवर घरासमोरील जागेतच पुरल्याची माहिती आहे.
बिबी का मकबरा परिसरातील रेणुकामाता नगर ही जागा सुप्रीम कोर्टाने मुळ मालक सोनवणे यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिल आहेत. त्यामुळे पोलिसांनी येथील रहिवाशांना जागा खाली करण्याच्या सुचना केल्या आहेत. महावितरण कंपनीने येथील वीज पुरवठा खंडीत केला आहे.

मुंबईतील वाहतूक सुरळीत
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत झाली आहे. कामशेतजवळ रेल्वे रुळाखालून खडी वाहून गेल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत झाली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पावसाचे औरंगाबादमधील फोटो....