आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षभरात महाराष्ट्रातून चोरांनी लांबवली ४५०० कोटींची संपत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चोरीच्या बाबतीत महाराष्ट्र हे चोरांसाठी सर्वात आवडीचे राज्य ठरले आहे. २०१५ च्या वर्षभराच्या कालावधीत चोराने राज्यातून तब्बल ४,५३३ कोटी ८९ लाख रुपयांची संपत्ती लंपास केली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशभरात चोरीस गेलेल्या एकूण संपत्तींपैकी निम्मी संपत्ती एकट्या महाराष्ट्रातीलच आहे. देशभरात चोरीच्या लाख २५ हजार घटनांची नोंद झाली असून त्यात ८,२०१ कोटी ४० लाख रुपयांची संपत्ती चोरांनी फस्त केली आहे. यात दरोडा, लूटमार, घरफोडी इत्यादी प्रकारांचा समावेश आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड विभागाने (एनसीआरबी) नुकत्याच जारी केलेल्या २०१५ या वर्षाच्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे. या अहवालानुसार, महाराष्ट्र हे चोरीचे हब ठरले असून एका वर्षात चोरट्यांनी महाराष्ट्रात ८७ हजारांपेक्षा अधिक घटना घडवल्या. ज्यात किरकोळ घटनांपासून दरोड्यांसारख्या अनेक घटनांचा समावेश आहे.

सुरक्षा यंत्रणेच्या हातावर तुरी
देशभरात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जागरूकता असल्याचे चित्र असले तरीसुद्धा चोरीच्या बाबतीत मात्र चोरच पोलिसांपेक्षा वरचढ ठरले आहेत. भारतातील विविध राज्यांमधून चोरीला गेलेल्या ८,२१० कोटी ४० लाखांच्या संपत्तीपैकी फक्त १,३५० कोटी १९ लाखांची संपत्तीच सुरक्षा यंत्रणा हस्तगत करू शकली आहे. हे प्रमाण चोरीला गेलेल्या एकूण संपत्तीच्या फक्त १६.१ टक्के इतकेच आहे. २००५ च्या तुलनेत २०१५ मध्ये तिपटीने संपत्ती चोरीला गेली आहे.

चोरांचे फावले, यंत्रणा त्रस्त
चोरांनीदेशातील एकूण राज्यांतून चोरलेल्या संपत्तीपैकी निम्मी एकट्या महाराष्ट्रातून चोरली आहे. मात्र, चोरांच्या या कृत्यांमुळे राज्यातील यंत्रणा चांगलीच त्रस्त आहे. चोरांनी राज्यातून तब्बल ४, ५३३ कोटी रुपयांची संपत्ती चोरली. मात्र, सुरक्षा यंत्रणा यापैकी २३० कोटी हजार रुपयांच्या म्हणजे केवळ ५.१ टक्के संपत्तीचाच छडा लावू शकली आहे.

मुळात यंत्रणेचा दोष - चोरीच्या तुलनेतवसुलीचे प्रमाण कमी असणे म्हणजे यंत्रणाच कुचकामी अन् अयशस्वी ठरणे होय. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर वचक ठेवण्यासाठी नेतृत्व तितकेच सक्षम असावे लागते. महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारच्या घटना घडूच नयेत यासाठी योग्य पावले उचलण्यात आलेली नसल्यामुळे चोरांचे फावले. परंतु अॅप, तक्रार निवारण अशा काही उपाययोजना फायद्याच्या ठरत आहेत. - प्रविण दीक्षित, निवृत्त पोलिस महासंचालक, महाराष्ट्र

धार्मिक स्थळेही ठरली लक्ष्य
२०१५ या वर्षात देशभरातील विविध धार्मिक स्थळांनाही चोरांनी त्यांचे लक्ष्य बनवले. धार्मिक स्थळांवरील वर्षभरातील अशा प्रकारच्या ५,८४३ घटनांमध्ये १३ कोटी लाख रुपयांची संपत्ती चोरीस गेली. यामध्ये भुरट्या चोरीच्या ३,४६२ घटनांमधून चोरांनी ११ कोटी ९४ लाख रुपयांची संपत्ती हडप केल्याचे समोर आले आहे.
बातम्या आणखी आहेत...